Nashik News : G 20 ही भारताला विश्वगुरू बनवण्यासाठीची एक सुरवात : राजेश पांडे

Rajesh Pandey felicitating Ajit Surana, for receiving the Jeevan Sadhana Award of Savitribai Phule Pune University.
Rajesh Pandey felicitating Ajit Surana, for receiving the Jeevan Sadhana Award of Savitribai Phule Pune University.esakal
Updated on

Nashik News : जी-२० ही भारताला विश्वगुरू बनवण्यासाठीची एक सुरवात आहे. जगातला सर्वात तरुण देश भारत बनणार आहे. (rajesh pande statement about G20 summit in india nashik news)

हीच तरुणाई भारताची संपत्ती बनवायची असेल, सामर्थ्य बनवायचे असेल तर जी-२० सारखे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले कार्यक्रम हे भारताचे भविष्य आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे यांनी केले.

चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन संस्थेच्या आबड -लोढा -जैन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसाचे अंतरवेद्या शासकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की या परिषदेच्या आयोजनाची संधी आहे. ती आत्मविश्वासाने आणि भविष्यकालीन अशा दूरगामी सकारात्मक परिणामांचा विचार करून स्वीकारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातून या बलाढ्य संघटनेमध्ये आपली पकड ही मजबूत केली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Rajesh Pandey felicitating Ajit Surana, for receiving the Jeevan Sadhana Award of Savitribai Phule Pune University.
Success Story : बचतगटाची झाली आता कंपनी; 21 प्रकारच्या मसाल्याचा राज्यभरात डंका...!

या परिषदेचे आयोजनातून आज ज्या काही जागतिक समस्या आहेत, त्यांना तोंड देण्यासाठी भारत तसेच संदेशही जगाला दिला आहे. आपण विश्वगुरू म्हणून जगाला शांततेचा संदेश आणि युद्धाची वेळ नाही इतके परखडपणे सांगू शकतो, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, असेही पांडे यांनी सांगितले.

विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती अध्यक्षस्थानी होते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे उद्धघाटक होते. ‘सकाळ’ च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य गोटन जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा यांचा सन्मानपत्र देऊन राजेश पांडे यांनी विशेष सत्कार केला.

Rajesh Pandey felicitating Ajit Surana, for receiving the Jeevan Sadhana Award of Savitribai Phule Pune University.
Fraud Doctors : आदिवासी भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; आरोग्य विभागाचे सोईस्कर दुर्लक्ष

प्रोफेसर तुषार चांदवडकर आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रा. प्रदीप वेताळ यांनी संपादित केलेल्या G-20 ची उपयुक्तता आणि भारत या विषयावरील संदर्भग्रंथाचे प्रकाशन विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य सागर वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष मनोगत बेबीलाल संचेती यांनी जी- २० चे महत्त्व विशद केले. डॉ. चांदवडकर यांनी सूत्रसंचालन तर विश्वस्त समितीचे सदस्य कांतिलाल बाफना यांनी आभार मानले.

‘जी २०’ भारताच्या सामर्थ्याची नांदी : डॉ. रनाळकर

परिषदेच्या आयोजनाची संधी पंतप्रधान मोदी यांनी प्राप्त करून जागतिक स्तरावर भारताचे स्थान बलाढ्य करण्यात यश प्राप्त केले आहे. हे आयोजन म्हणजे भारताच्या सामर्थ्याची नांदी होय. असे प्रतिपादन डॉ राहुल रनाळकर यांनी केले. आपल्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या भाषणांमधून डॉ. रनाळकर यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक परराष्ट्रीय धोरणाच्या मागील हेतूची मीमांसा केली.

Rajesh Pandey felicitating Ajit Surana, for receiving the Jeevan Sadhana Award of Savitribai Phule Pune University.
Nashik News : एका उंटामागे रोजचा खर्च 300 रुपयांचा; पांजरपोळमधील उंटांना शेंगदाणे अन गूळ असे खाद्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.