Nashik News : पालकमंत्र्यांच्या घरासमोरील बिऱ्हाड आंदोलनात राजु शेट्टी सहभागी होणार!

Raju Shetty
Raju Shettyesakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुली व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांची नावे कमी करुन लिलाव करण्याचे कारवाई विरोधात सर्व शेतकरी संघटना, राजकीय पक्ष एकवटले असून पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारी रोजी शेतकरी संघटना व थकबाकीदार शेतकरी व त्यांचे कुटुंब बिऱ्हाड आंदोलन करणार आहे.

यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवित स्वत: या आंदोलनात सहभागी होणार आहे. (Raju Shetty will participate in protest in front of house of guardian minister dada bhuse Nashik News)

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतुन सहकारी सोसायटी मार्फत जवळपास ६२ हजार शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे. जिल्हा बँक कर्ज वसुली करतांना अतिशय चुकीच्या मार्फत कर्ज वसुली करीत आहे. बळीराजा मागील गेल्या सात ते आठ वर्षापासून गारपिठ, पिकाला भाव नाही अशा अनेक आसमानी संकटापासुन त्रस्त आहे.

या सर्व संकटाना तोंड देत असतांना शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण, मुला-बाळाचे लग्न, तसेच प्रपंच या सर्व गोष्टी बघत असतांना जिल्हा बँकेची परतफेड झालेली नाही. या कारणाने जिल्हा बँक अतिशय चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची जुलमी वसुली करीत आहे.

यात शेतकऱ्यांच्या जमीनीवर नाव लावणे व लिलाव करणे अशी प्रकिया राबवित असल्याचा आरोप करीत, याबाबत सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येत १६ जानेवारी मालेगाव येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी जिल्हा बँकेचे थकबाकीदार आहेत.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Raju Shetty
Nashik Crime News : शर्ट चोरल्याच्या कारणावरून सेल्समनला बेदम मारहाण! मालकासह बाऊंसरवर गुन्हा दाखल

थकीत कर्जाची मुद्दल फेड करून घ्यावी, कर्जाचे पुनःगर्ठन करत गेल्याने शेतकऱ्यांची थकबाकी वाढत गेली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सरकारने अंदाजे ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी या मागण्यांसाठी शेतकरी बिऱ्हाड आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र येणार आहे. यामध्ये आता राजू शेट्टी यांनी सहभागी होण्याची माहिती दिली आहे.

त्यासोबतच मोर्चात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. केवळ सहभागी व्हायचं म्हणून होऊ नका तर जोपर्यंत या विषयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करा असे आवाहन राजु शेट्टी यांनी केले आहे.

यावेळी बँक करीत असलेल्या कारलाईची सविस्तर माहिती प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, गंगाधर निखाडे, प्रशांत कड, राजेंद्र महाले, संतोष रेहरे आदींनी यांनी राजू शेट्टी यांना दिल्यानंतर त्यांनीही या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे जाहिर केले असल्याने या आंदोलन एैतिहासिक ठरणार आहे.

Raju Shetty
Election News : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीसह 5 जागांसाठी 30 जानेवारीला मतदान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()