Rajya Natya Spardha 2023: ‘बसवण्णा ते महात्मा’ प्रवास उलगडणारे ‘बसवानुभव’

play 'Basavanubhav'
play 'Basavanubhav'esakal
Updated on

Rajya Natya Spardha 2023: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, वीरशैव धर्माचे पुनरुज्जीवन करणारे ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांचा जीवन प्रवास उलगडणारी नाट्यकृती ‘बसवानुभव’.

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत शनिवारी (ता. ९) श्री शिव छत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ या संस्थेतर्फे सादर करण्यात आले. राजेंद्र पोळ लिखित या नाटकाचे दिग्दर्शन चंद्रवदन दीक्षित यांनी केले. (Rajya Natya Spardha 2023 Basavanubhav unfolding journey from Basava to Mahatma nashik news)

कर्नाटकाच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून संत महात्मा बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी वीरशैव धर्माचे केलेले पुनरुज्जीवन, धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मयमय, राजकारण यात त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे.

अशा लहान बसवण्णा ते संत महात्मा बसवेश्वर असा या युगपुरुषाचा जीवन प्रवास या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उभा राहतो. लहान वयात त्यांच्या कुटुंबाला मिळणारी समाजातील वागणूक, लहानपणापासूनच त्यांचे धर्म, समाज अन् जीवन संबंधीचे तत्वज्ञान आणि घर सोडून सुरू केलेला प्रवास यात दाखविण्यात आला आहे.

एका युगपुरुषाची कहाणी ही नाट्यकृती सांगत होती मात्र सादरीकरणाने प्रेक्षकांचा पुरत हिरमोड केला. महात्मा बसवेश्वरांचा जीवनप्रवास नाट्यरुपाने मांडताना दिग्दर्शक सपशेल अपयशी ठरले. नाटकात काम करणाऱ्या पात्रांना प्रसंगांना पूरक असे संवादाचा अभाव होता. केवळ रेकॉर्डेड किंवा पार्श्व निवेदनाने नाटकाचे सादरीकरण पुढे रेटल्याने आपण नाट्यकृती पाहतो आहे की अभिवाचन किंवा कथाकथन ऐकतो आहे असा प्रश्न प्रेक्षकांपुढे उभा राहिला.

play 'Basavanubhav'
Rajya Natya Spardha 2023: ज्येष्ठांच्या एकटेपणाचा ‘खेळ मांडियेला’

एकूणच सादरीकरण करणारे कलावंतांमध्येही सरावाचा पुरेपुर अभाव दिसून आला. एकच नेपथ्य पूर्ण नाटकाला पुढे रेटत होते. प्रकाशयोजनादेखील साजेशी नव्हती. यातही पुन्हा सरावाचा अभाव जाणवला. पहिला अंक हा वेळेआधी संपला. यासह सादरीकरणादरम्यान मंचावरदेखील शिस्त पाळली जात नसल्याचे दिसून आले जेव्हा कोणाचा तरी हात फोटो काढण्यासाठी थेट विंगेतून बाहेर आला.

एकूणच बसवानुभवात कुठेही नाट्याचा अनुभव मिळाला नाही, मिळाला तो केवळ कथाकथन अर्थात अभिवचनाचा अनुभव. चंद्रवदन दीक्षित, दिलीप छाजेड, शनय गायकवाड, प्रदीप कुलकर्णी, सतीश गोऱ्हे, राणी ताकतोडे, प्रा. नीलेश जाधव, श्रेया शेजूळ या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या. राजेंद्र झाल्टे यांनी नेपथ्य व वेशभूषा साकारल्या. दिनेश चौधरी यांनी प्रकाशयोजना तर विक्रम दीक्षित यांनी पार्श्वसंगीत दिले. सुनील सूर्यवंशी यांनी रंगमंच व्यवस्था साकारली.

play 'Basavanubhav'
Rajya Natya Spardha 2023 : संहितेत फसलेला प्रयोग : म्याडम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.