एक स्त्री जेव्हा वासनेची शिकार होते अन् त्यानंतर तेच तीच आयुष्य होऊन बसतं अशा वासनेच्या डोहात गुंतलेल्या स्त्रीची कथा सांगणारी नाट्यकृती ‘कायाचक्र’.
६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत बुधवारी (ता. ६) समिज्ञा बहुद्देशीय संस्थेतर्फे सादर झाले. समीर गायकवाड लिखित कथेचे नाट्य रूपांतर मृणाल पाटील यांच्यासह समीर तोरसेकर यांनी करत दिग्दर्शनदेखील केले. (Rajya Natya Spardha 2023 Kayachakra Involved in Lust nashik)
वासनेच्या भुकेने अनेक लोक हे रेडलाईट एरियाचा रस्ता धरतात. मात्र याच रेडलाईट एरियात असलेल्या स्त्री हे काम आपणहून करतात की त्यांना ते करावे लागते, याबद्दल त्यांना काहीही देणघेण नसते.
ते केवळ आपल्या वासनेची भूक भागवतात. त्यांची ही भूक भागविताना त्या स्त्रीला होणाऱ्या यातना, अत्याचार जे मूक गिळून सहन करावे लागतात यावर नाट्य कथानकात भाष्य केले आहे. निर्मला या स्त्रीभोवती नाटकाचे कथानक आकार घेते.
कारागृहात खुनाची शिक्षा भोगत असलेली निर्मला आपल्या आयुष्यातील घटनांचे चित्र प्रेक्षकांसमोर मांडते. उत्तर प्रदेशातील एका गावातून जिथे स्त्रियांच्या देहावर अतोनात अत्याचार केले जातात, त्यातून पळ काढून ती बहिणीसह मुंबई गाठते.
मात्र मुंबईमध्ये आल्यावर पुन्हा तेच तिच्या नशिबी येते. आसरा देणारा त्यांची विक्री करतो, दोन्ही बहिणींची ताटातूट होते अन् तेथून त्यांच्या देहविक्री व्यवसायाला सुरवात होते. वासनेने बरबटलेल्या देहांना शांत करताना मात्र त्यांच आयुष्य उद्ध्वस्त होऊन बसते आणि संपूर्ण आयुष्य या कायाचक्राभोवती गुंतते.
नाटकाचे कथानक हे सत्य कथेवर आधारित आहे. स्त्रीत्त्वाचा गंभीर विषय मांडताना दिग्दर्शकाने अधिक मेहनत घ्यायला हवी होती, असे प्रकर्षाने जाणवले. छोट्या- छोट्या प्रसंगांसाठी घेतले गेलेले मोठे ब्लॅकआऊट रटाळ वाटले.
नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत अधिक प्रभावशाली करता आले असते. विक्रम गवांदे, हर्षाली भोसले, प्रिया पाटोळे, प्रशांत देशपांडे, मयूरी शुक्ला, मनवी शिंदे, स्वरा जाधव, आशा हरिश्चंद्र, वृषाली बच्छाव, ललिता जाधव, सुजित हरिश्चंद्र, खुशाल जगताप, रविराज वरखेडे, नूपुर ठाकूर, गायत्री पांढरपट्टे, विधी गांगुर्डे, मृणाल पाटील आणि पल्लवी ओढेकर या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या.
विक्रम गवांदे यांनी नाटकाचे नेपथ्य तर प्रकाशयोजना विनोद राठोड यांनी केले. गीता शिंपी यांनी पार्श्वसंगीत केले. नूपुर ठाकूर, ऐश्वर्या पवार यांनी नृत्य दिग्दर्शन केले.
प्रीती उमराळकर, पूजा बेलोकर यांनी रंगभूषा तर अंकिता मुसळे यांनी वेशभूषा साकारल्या. सोहम तोरसेकर, अद्वैत काळे यांनी रंगमंच साहाय्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.