Rajya Natya Spardha 2023: वृद्धांच्या एकटेपणाच्या प्रश्नाचे उत्तर शोधणारे ‘अभी तो मैं जवान हूँ’

An episode from the play 'Abhi To Main Jawan Hoon'.
An episode from the play 'Abhi To Main Jawan Hoon'.
Updated on

Rajya Natya Spardha 2023: वृद्धांच्या एकटेपणात नव्या जोडीदाराच्या साथीचा पर्याय मांडणारी नाट्यकृती म्हणजे ‘अभी तो मैं जवान हूँ’.

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत बुधवारी (ता. २९) मथुरा बहुद्देशीय विकास मंडळ, नाशिक या संस्थेतर्फे सादर झाले.

हेमंत गवळे यांनी या नाटकाचे लेखन अन् दिग्दर्शन केले. (Rajya Natya Spardha 2023 marathi drama Abhi To Main Jawan Hoon Seeks Answers to Elderly Loneliness nashik news)

आयुष्याच्या उत्तरार्धात दोघांपैकी एक जोडीदार सोडून गेला तर दुसऱ्याला एकटेपणामुळे सतत अस्वस्थता जाणवते. असा एकटेपणा वाट्याला येऊ नये म्हणून वृद्धांचा त्याच वयातील साथीदाराशी विवाह लावून दिला तर, याच प्रश्नावर नाटकाचे कथानक आधारित आहे. नाटकात देशमुख कुटुंबातील आजोबांना सोडून आजी देवाघरी निघून जातात.

मग आजोबा एकटे पडतात. आजी मात्र जाण्यापूर्वी मी गेल्यावर तुम्ही दुसरं लग्न करावं, असं वचन आजोबांकडून घेतात. मग काय, आजोबांसाठी साथीदाराचा शोध सुरू होतो. वृद्धांच्या एकटेपणाला कोण, या प्रश्नाचे उत्तर म्हणून या निर्णयाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे.

या गंभीर विषयाला प्रेक्षकांसमोर मांडताना दिग्दर्शकाने विनोदाची झालर पांघरल्याने रसिकांपर्यंत पुरेपूर विषय पोचला. हलके-फुलके विनोद, कलावंतांची भूमिकेवर पकड अन् साजेसे प्रसंग यामुळे प्रेक्षक नाटकात तल्लीन झाले होते.

An episode from the play 'Abhi To Main Jawan Hoon'.
Rajya Natya Spardha 2023 : फाळणीच्या भळभळत्या जखमेचे वास्तव...‘मजार’

प्रयोग सुरू असताना चंबू करत असलेल्या चुका ज्या कॉकरोच सूत्रधार रूपाने योग्य पद्धतीने दाखवून देत होते, ते प्रेक्षकांना आकर्षक वाटले. नाटकाच्या सुरवातीला तंत्रज्ञांचा परिचय अनोख्या पद्धतीने करून देण्याचा दिग्दर्शकाचा प्रयोग पुरता यशस्वी ठरला, असे म्हणायला हरकत नाही.

कैलास जाधव, अतुल गायकवाड, सायली निकम, मुकुंद भड, मंजूषा ठाकरे, रसिका देशपांडे, साईप्रसाद शिंदे, संकेत चव्हाण, पूजा चव्हाण, तनिषा जाधव, संस्कृती गायकवाड, हेमंत गवळे या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या.

विनोद राठोड यांनी प्रकाशयोजना, तर ललित कुलकर्णी यांनी नाटकाचे नेपथ्य साकारले. संकेत चव्हाण यांनी पात्रांच्या वेशभूषा साकारल्या.

आजचे नाटक - द कॉन्शन्स

लेखक - अमेय दक्षिणदास

दिग्दर्शक - विनय कटारे

An episode from the play 'Abhi To Main Jawan Hoon'.
Rajya Natya Spardha 2023: हरवत चालेल्या गोष्टीचा शोध घेणारे ‘चोरीला गेलाय’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.