Rajya Natya Spardha 2023: नात्याच्या पलीकडचे नात जपणारे ‘रा+धा=’

An episode from Parashuram Saikhedkar theater play 'Ra+Dha'...
An episode from Parashuram Saikhedkar theater play 'Ra+Dha'...esakal
Updated on

आयुष्याचे गणित नात्याच्या पलिकडे जाऊन सोडवत आयुष्य जगणे काय असते, हे शिकवणारी नाट्यकृती म्हणजे 'रा + धा =’. ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मंगळवारी (ता. ५) नाट्यभारती, इंदूर या संस्थेतर्फे सादर झाले.

रवींद्र लाखे यांच्या मुळ कथेचे नाट्यरुपांतर अन् दिग्दर्शन श्रीराम जोग यांनी केले. (Rajya Natya Spardha Ra dha that preserves ties beyond relationship nashik)

नाटकातील मुख्य पात्र घनश्याम एक गणितज्ज्ञ. आयुष्यभर गणिताचे प्रमेय सोडवताना नात्याचे अन् व्यवहाराचे गणित सोडवायला विसरतो. त्यामुळेच त्याचा सारा परिवार त्याला सोडून निघून जातो.

प्रसिद्ध कवयित्री एमिली डिकिन्सनला आपला आदर्श मानून घराच्या चार भिंतीत आपले सगळ जग सामावून घेतो. केवळ पुस्तकांचे वाचन करण हा त्यांचा दिनक्रम होऊन बसतो. मात्र कमकुवत झालेल्या नजरेने वाचन करणे अशक्य होते तेव्हा राधाचा त्यांच्या घरात प्रवेश होतो.

राधाही एकटीच असते. राधाच्या प्रवेशानंतर घनश्यामचा एकटेपणा दूर व्हायला लागतो. ते दोघं एकमेकांत वेगवेगळे नात शोधू लागतात. आपलं आयुष्य जगताना नात्याची गणित आपल्याला सोडवावी लागतात याची अनुभूती प्रेक्षक या नाटकातून अनुभवतात.

An episode from Parashuram Saikhedkar theater play 'Ra+Dha'...
Rajya Natya Spardha 2023: भावना अन् विचारांचा पाऊस ‘मुंबई मॉन्सून

श्रीराम जोग, श्रुतिका कळमकर, श्रीरंग डिडोळकर, दिलीप लोकरे, अनंत मुंगी, प्रतिक्षा बेलसरे, लोकेश निमगावकर, प्रांजली सरवटे या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या. अनिरुद्ध किरकिरे यांनी नेपथ्य तर अभिजित कळमकर यांनी प्रकाशयोजना साकारली.

शशिकांत किरकिरे यांनी संगीत संयोजन केले. दीपाली दाते यांनी रंगभूषा तर प्रांजली सरवटे यांनी पात्रांच्या वेशभूषा साकारल्या. रजत मुजुमदार, अंकुर लोकरे, ऋत्विक तेलंग, संध्या जोग यांनी रंगमंच साहाय्य केले.

An episode from Parashuram Saikhedkar theater play 'Ra+Dha'...
Rajya Natya Spardha 2023 : ‘ती’च्या व्यथेवर भाष्य करणारे नाट्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.