sangeet avdhadiche pach divas
sangeet avdhadiche pach divasesakal

Rajya Natya Spardha: अनिष्ट रुढींची वास्तविकता मांडणारे : ‘संगीत अवघडीचे पाच दिवस’

Published on

Rajya Natya Spardha : उद्‌घाटनानंतर ‘संगीत अवघडीचे पाच दिवस’ नाट्यकृतीने स्पर्धेला प्रारंभ झाला. आपली बांधिलकी सोशल फाउंडेशन, नाशिक संस्थेतर्फे नाटक सादर करण्यात आले. ओमकार टिळे यांनी लेखन व दिग्दर्शन केले.

दक्षिणेकडील चिरीपल्ली गावातील जोगतीणीची कहाणी सांगणारे या नाटकाचे कथानक आहे. स्त्रीच्या मासिक धर्माबाबत असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा बंद करून आप्पा जोगतीण परिवर्तन घडवते. (Rajya Natya Spardha Presenting reality of unwanted stereotypes sangeet avdhadiche pach divas nashik)

या अनिष्ट रूढी, परंपरा का बंद व्हायला हव्यात, याचे प्रबोधन नाटकाच्या कथानकातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले आहे. लेखक-दिग्दर्शक ओमकार टिळे यांनीच प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा व नाटकात अभिनय अशा अनेक भूमिका निभावल्या.

त्यामुळे सर्वकाही ओमकार टिळे झाल्याने त्यांचाच काहीसा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. गंभीर विषयाचे सादरीकरण करताना दिग्दर्शकाने कथानकाच्या मांडणीवर अधिक भर देणे गरजेचे असल्याचे जाणवत होते.

प्रकाशयोजना अधिक प्रभावशाली करता आली असती. ओम आर्ट्स स्टुडिओने नाटकाचे नेपथ्य अन् संगीत केले. कथानकाला साजेसे नेपथ्य करण्याचा अजून प्रयत्न व्हायला हवा होता. नाटकाला लाइव्ह व रेकॉर्डेड अशा संगीताची गुंफण होती.

मात्र याची सांगड कमी पडताना दिसली. प्रेक्षकांपर्यंत कलावंतांचा पुरेसा आवाजही पोचत नव्हता. संगीत नाटक असल्याचे साहजिकच रसिकांसाठी संगीत पर्वणी होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे कलाकृतीचा आस्वाद घेण प्रेक्षकांना काहीसे अवघड गेल्याचे दिसले.

sangeet avdhadiche pach divas
Rajya Natya Spardha: सायखेडकर नाट्यगृह सुधारणेची नितांत गरज : प्रा. रवींद्र कदम

मोहिनी भगरे, सौरभ पगारे, दर्शना वैद्य, राज कुंदन, ऐश्वर्या धोटे, इंद्रायणी गांगुर्डे, आयुष जाचक, सौरभ पगारे, प्रबुद्ध माघाडे, प्रतिक्षा ठाकूर, सारिका शिंदे, प्रसाद चव्हाण, कैलास शिरसाट, वैभव काळे, श्रेयस हिरे, दीक्षा पवार, आकांक्षा

देशमाने, मैथिली सोनावणे, सत्यकी देशमुख, मधुरा तरटे, स्वरूप पिसे, श्रावणी गीरोल्ला, स्नेहा केदारे, रोहन पाटील, अनुराग कडेकर

यांनी नाटकात भूमिका साकारल्या. नाट्यगृहात प्रवेशावेळी रसिकांना संस्थेतर्फे भंडारा अन् अत्तर लावण्यात येत होते. यांसह नाटकाचे कथानक दाक्षिणात्य असल्याने प्रवेशद्वाराला लावलेली केळीच्या पानांची कमान विशेष आकर्षण ठरत होती

sangeet avdhadiche pach divas
Nashik News: डिंकाच्या लाडूचा गोडवा वाढणार; सुकामेव्याच्या दरात यंदा सरासरी 20 ते 30 टक्के घसरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.