Rajya Natya Spardha: सायखेडकर नाट्यगृह सुधारणेची नितांत गरज : प्रा. रवींद्र कदम

Rajya Natya Spardha: सायखेडकर नाट्यगृह सुधारणेची नितांत गरज : प्रा. रवींद्र कदम
Updated on

Rajya Natya Spardha : परशुराम सायखेडकर नाट्यगृहावर प्रेमापोटी असुविधा असतानाही कलावंत आपली कला सादर करतात. (Rajya Natya Spardha Prof Ravindra Kadam statement Saykhedkar theater reforms urgently needed nashik news)

मात्र आता या नाट्यगृहात सुधारणा व्हावी अन् पुढच्या राज्यनाट्य स्पर्धेला रंगकर्मी व प्रेक्षकांना अद्ययावत सुविधांनी सज्ज सायखेडकर नाट्यगृह मिळावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी केले.

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.हौशी मराठी नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा सोमवारी (ता. २०) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात वाजली. मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. स्पर्धेचे परीक्षक योगेश शुक्ल, संजय भाकरे, अर्चना कुबेर उपस्थित होत्या. राज्य नाट्य स्पर्धेला फारसा प्रेक्षक लाभत नाही.

मात्र नाशिक याला अपवाद असून, नाट्यगृह प्रेक्षकांनी तुडुंब भरले आहे, ही अभिनंदनीय बाब असल्याचे परीक्षक संजय भाकरे यांनी मनोगतातून सांगितले.

Rajya Natya Spardha: सायखेडकर नाट्यगृह सुधारणेची नितांत गरज : प्रा. रवींद्र कदम
Rajya Natya Spardha: राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा! 20 नोव्हेंबरपासून सुरवात

पाहुण्यांचे स्वागत नाशिक केंद्र समन्वयक राजेश जाधव, सहसमन्वयक मीना वाघ, रंगभूषाकार माणिक कानडे यांनी केले. श्रीपाद कोतवाल यांनी सूत्रसंचालन केले.

राज्यात ७५ नाट्यमंदिरे उभारणार

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उद्‌घाटन सोहळ्यात संदेश दिला. ६१ वर्षांपासून राज्य नाट्य घेणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. त्यामुळे या स्पर्धेची व्याप्ती वाढविणे तसेच पुरस्कार राशी, प्रेक्षक, मानधन वाढीबाबत वित्त विभागाशी गंभीर चर्चा करणार आहे.

अर्थसंकल्पात याला नियत्वे मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यात ७५ नवीन नाट्यमंदिरे उभारणार यांसह रवींद्र नाट्यमंदिराचे नूतनीकरण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Rajya Natya Spardha: सायखेडकर नाट्यगृह सुधारणेची नितांत गरज : प्रा. रवींद्र कदम
Rajya Natya Spardha: राज्य नाट्य स्पर्धेचा उद्यापासून रंगणार ‘नाट्यसंग्राम’! 22 नाटकांची रसिकांना मेजवानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.