नाशिक : आयुष्यात आलेल्या वळणांवर नवा आशेचा किरण पाहात नव्याने सुरवात करणाऱ्या स्त्रियांची नाट्यकृती म्हणजे ‘माझा खेळ मांडू दे’. ६२ व्या राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी (ता. २२) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या नाट्यकृतीचे सादरीकरण झाले.
सई परांजपे लिखित या नाटकाचे सुरेखा लहामगे- शर्मा यांनी दिग्दर्शन केले. (Rajya Natya Spardha Start new phase of life majha khel mandu de nashik)
सेवा श्रॉफ या एकट्या गरजू मामी, पद्मिनी आणि रिबेका या गरजू स्त्रियांना पेइंग गेस्ट म्हणून माफक दरात आसरा दिला. या तिघी एकत्र आल्या अन् येथूनच नाटकाचं खर कथानक सुरू झाले. प्रत्येकीने प्रसंगानुरूप आपल्या आयुष्यातील व्यथा मांडल्या.
मामीच्या आयुष्यात वासनेच्या रूपाने आलेला मामा अन् नंतर सासरा यातून तिने दिलेला लढा तर पतीने छळ करत पद्मिनीचा केलेला छळ अन् विश्वास घात त्यांनी कथन केला. रिबेकाने आपल्या जन्मापासून ते गोवर्धन नामक नराधमाने केलेल्या छळाचे वर्णन सांगितले.
तिघींच्याही या व्यथित प्रवासात त्यांना एक आशेचा किरण दिसला. पद्मिनीला कारखानीसांच्या तर रिबेकाला टॉनीच्या रूपाने. यातून पुन्हा त्यांनी नव्याने आयुष्याची सुरवात करत स्वतःचा एक नवा खेळ मांडला.
नाटकाच्या सादरीकरणादरम्यान कलावंतांचा मंचावर असलेला वावर, पाठांतराचा अभाव आणि त्यांचा होणारा गोंधळ दिसून येत होता. विनोदी तथा भावनिक करणाऱ्या प्रसंगांची मांडणी करताना दिग्दर्शकाने अधिक प्रभावी काम करणे गरजेचे होते असे प्रत्येक प्रसंगातून जाणवले.
पहिला अंक तर केवळ कहाणी सांगण्यात गेल्याने काहीसा रटाळ वाटला. दुसऱ्या अंकात कहाणीचे प्रसंगात रूपांतर केल्याने काही अंशी मनोरंजन झाले. संगीत अतिउच्च स्वरात असल्याने कलावंतांचे शब्द प्रेक्षकांपर्यंत पोचायला अडथळा निर्माण करत होते.
प्रभावी प्रकाशयोजना साकारता आली असती. नेपथ्य प्रसंगाना साजेसे, तर पात्रांच्या रंगभूषा अन् वेशभूषा पात्रांना साजेशा होत्या. यशवंत भालेराव, शुभम दाणी, ज्योत्स्ना सोनवणे, विशाखा धारणकर, तृप्ती जव्हेरी, रेवती अय्यर या कलावंतांनी भूमिका साकारल्या.
प्रकाशयोजना रवी रहाणे यांनी तर संगीत संयोजन नंदू परदेशी यांनी केले. शैलेंद्र गौतम यांनी नेपथ्य केले. सई मोने- पाटील यांनी वेशभूषा तर माणिक कानडे यांनी रंगभूषा केली.
आजचे नाटक : स्मरणार्थ
लेखक : गिरीश जुन्नरे, दिग्दर्शक - सुरेश गायधनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.