Rajya Natya Spardha: स्त्रीने पुरुषावर केलेल्या अभियोगाची गोष्ट ‘प्रथम पुरुष’

Rajya Natya Spardha: स्त्रीने पुरुषावर केलेल्या अभियोगाची गोष्ट ‘प्रथम पुरुष’
esakal
Updated on

मानवीय दृष्टिकोनातून समाजाच्या न्यायालयात स्त्रीने पुरुषावर केलेल्या अभियोगाची गोष्ट सांगणारी नाट्यकृती म्हणजे ‘प्रथम पुरुष’.

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रविवारी (ता. २६) कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, नाशिक संस्थेतर्फे हे नाटक सादर करण्यात आले. संकेत सीमा विश्वास यांनी नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले. (Rajya Natya Spardha story of womans accusation against man Pratham Purush nashik)

समाजातील पुरुषाचे स्थान टिकविण्यासाठीचा झगडा, त्यातून स्त्रीवर होणारे अन्याय, पितृसत्तेला बळकटी देणारे घटक, जात, वर्ग, धर्म, लिंग हा संघर्ष अन् त्यातून होणारी हिंसा व गुंतागुंत, बेरोजगारी अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या मुळाशी जाणारे या नाटकाचे कथानक आहे.

सुशील सुर्वे, कृष्णा कांगणे, गायत्री नेरपगारे, साक्षी काकडे, अर्चना नाटकर, नागेश धुर्वे, मानसी कावळे, प्राजक्ता कापडणे, राहुल गायकवाड, प्रणव काथवटे, कैवल्य चंद्रात्रे, ओम हिरे, मनोहर पगारे, अमन, तल्हा, डॉ. सोनाली ठवकार, मयूर इनामके, सविता जोशी, मिलिंद चिगळीकर, प्रकाश पिंगळे, अवेशा लोहिया, संकेत सीमा विश्वास या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या.

Rajya Natya Spardha: स्त्रीने पुरुषावर केलेल्या अभियोगाची गोष्ट ‘प्रथम पुरुष’
Rajya Natya Spardha 2023 : सशक्त संहितेचे संथ सादरीकरण : थेंब थेंब आभाळ

शंतनू कांबळे, संभाजी भगत यांनी कविता व गीतनिर्मिती केली. संगीत तेजस बिल्दीकर, नेपथ्य मुक्ता, प्रकाशयोजना समीर तभाने, वेशभूषा वैभवी चव्हाण यांनी साकारल्या.

आजचे नाटक - उम्मीद
लेखक व दिग्दर्शक - अभिषेक लोकनार

Rajya Natya Spardha: स्त्रीने पुरुषावर केलेल्या अभियोगाची गोष्ट ‘प्रथम पुरुष’
Rajya Natya Spardha 2023: दीड शतकांचा सामाजिक प्रवास उलगडणारा ‘विदूषक’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.