नागरी युद्धादरम्यान सामान्यांना येणाऱ्या अडचणी, आर्थिक, शैक्षणिक जीवनात माजणारी अस्थिरता या प्रश्नांना अधोरेखित करणारी नाट्यकृती म्हणजे ‘उम्मीद’.
६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सोमवारी (ता. २७) लोकहितवादी मंडळ, नाशिकतर्फे हे नाटक सादर करण्यात आले. अभिषेक लोकनार यांनी या नाटकाचे लेखन अन् दिग्दर्शन केले. (Rajya Natya Spardha umed that seeks peace through turmoil of war nashik)
कुराणातल्या सुरहवर यावर नाटकाचे कथानक लिहिण्यात आले आहे. युद्ध म्हटलं, की त्यात भरडला जातो तो सर्वसामान्य. युद्धामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित होते. शैक्षणिक संस्थेवर त्याचा थेट परिणाम होतो.
समाजात अस्थिरता निर्माण होते. युद्धजन्य क्षेत्रात वास्तव्यकरण तेथील लोकांना असह्य होऊन जात. तेव्हा ते नव्या उमेदीने शांततेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात.
मध्यपूर्वेतील देशात सतत चालत आलेल्या युद्धाला आणि प्रदीर्घ काळ चालणाऱ्या अत्याचाराला कंटाळून आपली राहती घरं सोडून जीवनात नव्या आशेची उमेद शोधणाऱ्या लोकांची वानवा या नाट्यकृतीतून प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळते.
सागर संत, रुपश्री कुलकर्णी, वैष्णवी लोकनार, तन्मय भोळे, विनीत पंडित, तेजस मोहिते, सुविज्ञा बधान, मुक्ता शेपाळ, भक्ती नाईक, ईशान घोलप, ललित श्रीवास्तव, आदित्य समेळ, गोरवाडकर, युगा कुलकर्णी, स्वानंदी पवार, साक्षी शिंगणे, ध्रुम शाह, वेदिका खर्डे, आदित्य ढमाले, रोशन चव्हाण, अथर्व जोशी या कलाकारांनी नाटकात भूमिका साकारल्या.
आदित्य समेळ यांनी नेपथ्य, तर सागर पाटील यांनी प्रकाशयोजना साकारल्या. अमेय जोशी यांनी संगीत संयोजन, वेशभूषा रोहिणी जोशी, रंगभूषा व केशभूषा स्वरांजली गुंजाळ, पूर्वा लबडे यांनी साकारल्या. विक्रम सोनवणे यांनी नेपथ्य निर्मिती केली.
आजचे नाटक - चोरील गेलाय
लेखक - कृष्णा वाळके
दिग्दर्शक - प्रवीण जाधव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.