Nashik : टपाल कर्मचाऱ्यांच्या संपाने भाऊरायास राखीची प्रतीक्षा

Postal workers strike latest marathi news
Postal workers strike latest marathi newsesakal
Updated on

जुने नाशिक/ नाशिक : टपाल कर्मचाऱ्यांच्या अचानक एकदिवसीय संपाने भाऊरायास राखीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी टपाल कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने बहुतांशी काम ठप्प पडले आहे. त्याचा परिणाम राखी टपालावर सर्वाधिक झाला आहे.

केंद्र सरकारतर्फे टपाल कार्यालय खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. खाजगीकरण थांबवावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा मुख्य मागण्यासह विविध मागण्यासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज युनियन रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी अचानक एक दिवशीय संप पुकारला. त्यामुळे बुधवारी (ता. १०) टपाल विभागाच्या विविध सेवा ठप्प पडल्या. (raksha bandhan 2022 postal department workers strike Nashik Latest Marathi News)

विशेष करून आरएमएस रेल्वे मेल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. देशभरातून येणारे विविध पार्सल, टपाल या ठिकाणी येऊन संबंधित टपाल कार्यालयात वाटप केले जाते. रेल्वे मेल सेवेचे संपूर्ण कर्मचारी संपावर असल्याने टपाल कार्यालयांमध्ये पार्सल टपाल पोचू शकले नाही.

संबंधित टपाल कार्यालयांना राखी पार्सल पोचू शकले नसल्याने त्यांचे वाटप करणे शक्य झाले नाही. शिवाय पोस्टमनदेखील संपात सहभागी आहे. त्यामुळे देशभरातून परजिल्ह्यातून टपाल विभागाच्या माध्यमातून बहिणींनी पाठवलेल्या राख्यासाठी भाऊरायांना एक दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गुरुवारी (ता. ११) कार्यालयांचे काम सुरळीत सुरू झाल्यावर टपाल कार्यालयांच्या ताब्यात पार्सल येतील. त्यानंतर विभागीय त्यांची छाटणी करण्यात येईल. त्यात संपूर्ण दिवस जाऊन शुक्रवारी (ता. १२) भावांना बहिणीच्या राख्या मिळतील. सणाच्या एक दिवस अगोदर संप पुकारल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

खासगी चालकांची मदत

संपात मोटर मेल वर्कर यांचाही समावेश असल्याने टपाल पार्सलची वाहतूक करणारे वाहनचालकदेखील संपात सहभागी झाले होते. रक्षाबंधनानिमित्त जीपीओ टपाल कार्यालयाचे वरिष्ठ पोस्ट मास्तर रामसिंह परदेशी यांनी मंगळवारी (ता.१०) रात्री उशिरापर्यंत रेल्वे मेल सेवेच्या अधिकाऱ्याची चर्चा करून कमीत कमी राखीचे पार्सल देण्याची विनंती केली.

परंतु ते आणण्यासाठी चालक नसल्याने खासगी चालकांचा वापर करत राखी टपाल पार्सल मागविण्यात आले. जीपीओ टपाल कार्यालयातील २५ पोस्टमन पैकी उपस्थित असलेल्या ४ पोस्टमनच्या माध्यमातून टपाल वाटप करण्यात आले.

Postal workers strike latest marathi news
मालेगाव : मोसम नदीत बुडाले दोघे तरुण; शोध कार्य सुरु

एनएफपीई संघटनेची लाक्षणिक निदर्शने

टपाल विभागाच्या सहा भागात विभाजन केले जाणार आहेत. याविरोधात नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल युनियन (एनएफपीई) फेडरेशनने देशव्यापी संप पुकारला असून, यास जिल्ह्यातील संघटनांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.

नाशिक प्रधान हेड पोस्ट ऑफिसबाहेर संघटनेने लाक्षणिक निदर्शने केली. एनएफपीई प्रणीत ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुप सी, पोस्टमन, एमटीएस व ग्रामीण डाकसेवक व रेल्वे मेल सर्व्हिसेसचे कर्मचारी सहभागी झाले.

तसेच संघटनेचे वर्ग तीनचे अध्यक्ष शैलेंद्र कुलकर्णी, सचिव दिलीप सोनवणे, खजिनदार सचिन अनरथे, पोस्टमन अध्यक्ष हेमत धारणकर, सचिव सुभाष दराडे, खजिनदार उत्तम धुर्जड, जीडीएस संघटना सचिव सुनील जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.

"विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून संप करण्यात आला होता. रक्षाबंधनानिमित्त बहिणीने पाठवलेल्या राख्या वेळेवर भावांपर्यंत पोचवाव्यात, या उद्देशाने खासगी चालकांची मदत घेण्यात आली. २५ ते ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी टपाल कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते." - रामसिंग परदेशी, वरिष्ठ पोस्ट मास्तर जीपीओ

Postal workers strike latest marathi news
बबन घोलप यांच्यावर कारवाई करा; मिलिंद यावतकर यांचे निवडणूक आयोगाला निवेदन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.