Raksha Bandhan 2023 : ‘एक वचन दे दादा हेल्मेट घालशील सदा सर्वदा’, ‘हेल्मेट है जरुरी ना समझो इसे मजबुरी’ ‘एक राखी कशासाठी भावाच्या रक्षणासाठी’, अशा घोषणा देत गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचने आडगाव नाक्यावर विनाहेल्मेट वाहनधारकांना रविवारी (ता. १०) राखी बांधण्याचा उपक्रम राबविला. (Raksha Bandhan 2023 Rakshas tied to helmetless motorists initiative of girija Womens Forum Nashik)
नाशिक पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेचे उपक्रमाला सहकार्य मिळाले. विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना गिरजा महिला मंच सदस्यांनी औक्षण करून, पेढा भरवत राखी बांधली. दादा हेल्मेट घालशील सदा सर्वदा असे वचन घेण्यात आले.
वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शिंदे, श्री. देवगडे, श्री. जगताप, श्री. इंगोले, श्री. बागूल, श्री. पिंपळसे, श्री. चव्हाण, श्री. महाले, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. अश्विनी बोरस्ते, सरचिटणीस प्रतिभा म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष भाग्यश्री चौधरी, जिल्हा सचिव भारती निकम, शहर कार्याध्यक्ष नेहा कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष माधुरी भावनाथ,
संचालिका रूपाली ठोंबरे, मनवी शिंदे, हर्षाली भोसले, सदस्या जयश्री क्षीरसागर, शीतल महाजन आदींनी विना हेल्मेटधारकांना राखी बांधली. सूत्रसंचालन माधुरी भावनाथ यांनी, तर नेहा कुलकर्णी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.