Rakshabandhan 2023 : यंदा बाजारात खास ‘ईव्हील आय’ राखी! आकर्षण राख्यांनी बाजारपेठ फुलली

raksha bandhan 2023 sisters buying rakhi for their brothers nashik news
raksha bandhan 2023 sisters buying rakhi for their brothers nashik newsesakal
Updated on

Rakshabandhan 2023 : भाऊ- बहिणीच्या नात्याचे प्रतीक असलेल्या राखीची बाजारपेठ सजली आहे. भावास कुणाची नजर लागू नये, यासाठी यंदा बाजारात खास ‘ईव्हील आय’ राखी बाजारात विक्रीस आली आहे. रक्षाबंधन सण ३० ऑगस्टला साजरा होणार आहे.

त्यानिमित्त आकर्षक राख्यांची बाजारपेठ सजली आहे. जागोजागी राखी विक्रीच्या दुकाने थाटली आहेत. ब्रेसलेट, गोंडा (देव राखी), कार्टून, मोती राखी विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत. (raksha bandhan 2023 sisters buying rakhi for their brothers nashik news)

अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन आल्याने राखीचे दुकान महिलांच्या गर्दीने फुलले आहेत. अनेकांना रोजगार मिळाला आहे. ठिकठिकाणी हंगामी व्यावसायिकांकडून राखीचे दुकाने थाटले आहे. बेरोजगार तरुणांकडून चारचाकी हातगाड्यांवर राखी विक्रीचा व्यवसाय केला जात आहे. काहींकडून फेरी मारून विक्री केली जात आहे. यंदा बाजारात प्रथमच ‘ईव्हील आय’ राखी विक्रीस आली आहे.

भावाचे वाईट नजरेपासून रक्षण व्हावे, यासाठी ईव्हील आय राखीस महत्त्व आले आहे. पूर्वी अशा प्रकारचे ब्रेसलेट बाजारात विक्रीस येत होते. राखीच्या स्वरूपात प्रथमच विक्रीस आले आहे. त्यामुळे आकर्षण ठरत आहे. काही दुकानांमध्ये तर तुटवडा जाणवत आहे. त्यापाठोपाठ रुद्राक्ष आणि मोती राखीस मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अद्याप हवा तसा ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बाजारपेठ अतिशय संथ आहे. बहुतांशी भागात पाऊस पडला नसल्याने ग्रामीण भागात अतिशय हलाखीची परिस्थिती आहे. त्याचा परिणाम यंदाच्या बाजारपेठेवर झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील ग्राहकांचे खरेदीचे प्रमाण आत्तापर्यंत केवळ १० ते १५ टक्के असल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

raksha bandhan 2023 sisters buying rakhi for their brothers nashik news
Raksha Bandhan 2023: स्वातंत्र्यलढ्यात राखी बनली होती प्रमुख हत्यार, गुरुदेव टागोरांचे आहे मोठे योगदान

असे आहे राखींचे दर

राखी प्रकार दर

मोती राखी १० ते २००

क्रिस्टल १० ते ५०

रुद्राक्ष राखी १० ते १००

लुंबा राखी १० ते ५०

कपल राखी ३० ते २००

चांदीची राखी ५० ते २००

ब्रेसलेट राखी ५० ते २००

कार्टून राखी १० ते ५०

लायटिंग राखी ५० ते १००

देव राखी ०५ ते ४०

पुष्पा राखी १० ते ५०

ईव्हील आय राखी २८

"गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची बाजारपेठ संथ आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून खरेदीकडे पाठ करण्यात आली आहे. पाऊस नसल्याचा मोठा परिणाम झाला आहे." - विशाल भालेकर, व्यावसायिक

raksha bandhan 2023 sisters buying rakhi for their brothers nashik news
Rakshabandhan 2023 : डिजिटल युगातही टपालाचे महत्त्व कायम! भाऊरायापर्यंत राखी पोचवण्यासाठी बहिणींकडून पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()