जुने नाशिक : सराफ बाजार आणि पंचवटीस जोडणारा रामसेतू पुलास काही ठिकाणी तडा (Crack) जाऊन भगदाड पडले आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन. डी (Collector Gangadharan D), महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh pawar) आणि पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik Ppolice commissioner jayant naiknavare) यांनी पुलाची पाहणी करत पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला. (Ram Setu bridge is closed for traffic due to crack nashik rain Latest Marathi News)
गोदावरीवरील पुरातन रामसेतू पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. आजपर्यंतच्या पुराने पुलावरील रस्ता वाहून गेला आहे. शिवाय गेल्या तीन दिवसापासून नदीस पूर असल्याने फुलाचा धोकादायक भागास पडलेले तडे मोठे झाले. काही ठिकाणी तर मोठमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे पूल अतिशय धोकादायक झाला आहे.
याबाबतची माहिती मिळताच महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सूचना करत पूल रहदारीसाठी बंद केला. दोन्ही बाजूंनी बॅरिकेटिंग लावण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी गंगाथरन. डी, महापालिका आयुक्त रमेश पवार आणि पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पुलाची पाहणी केली. पुलास पडलेले तडे, भगदाडची पाहणी केली. नवीन पूल बांधायचा की त्याचीच योग्यप्रकारे दुरुस्ती करायची, पूल पाडणे योग्य राहील का, पूल पाडल्यानंतर कुठल्या प्रकारची गैरसोय होईल, अशा विविध बाबींची या वेळी चर्चा करण्यात आली.
याबाबत पुरातत्त्व विभागाचाही सल्ला घेऊन कारवाई करणे योग्य राहील, असेही चर्चेत स्पष्ट करण्यात आले. आणखी कुठल्या उपाययोजना करण्यात येतील, यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
पूल पाडण्यास विरोध
पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेटिंग करून या ठिकाणी धोक्याचे फलक लावण्यात आले आहे. दुसरीकडे पूल पाडण्यास नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून कुठला निर्णय घेण्यात येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.