मालेगाव (जि. नाशिक) : देशभरात शुक्रवारपासून (ता.२३) रमजानचे रोजे (उपवास) सुरु होत आहेत. चंद्रदर्शन झाल्यानंतर प्रत्येक मशिदीत तरावीची नमाज पठण होणार आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या काळापासून रमजान महिन्यात सुन्नत ए मोअकिदा (तरावीची नमाज) पठण केली जाते.
पवित्र कुराण रमजान महिन्यात अवतरले होते. त्यामुळे शहरातील सुमारे साडेचारशे मशिदीत, उर्दू शाळा, घराघरात तरावीची नमाज पठण केली जाणार आहे. (Ramadan Festival Taraweeh prayer begins after moon sighted Four half hundred mosques Urdu schools house recitations namaz nashik news)
यापूर्वी तीन दिवस तरावीची नमाज पठण होत होती. त्याकाळी प्रथमच तरावीची नमाज इमाम म्हणून (सहाबी) हजरत उबैइ इब्ने काबा यांनी प्रथमच अनुयायांसह नमाज पढवली. त्या दिवसापासून रमजान महिन्यात तरावीची नमाज पठण केली जाते.
तरावीची नमाज वीस रकाअत असते. या नमाजमध्ये रोज कुराणच्या एक पारापासून ते तीन पारापर्यंत पठण केली जाते. विशेषत: मशिदीत हाफीज (इमाम) यांचे कुराण तोंडपाठ असते. शहरातील काही मशिदींमध्ये दोन वेळा तरावीची नमाज अदा केली जाते.
तरावीच्या नमाजमध्ये सुरवातपासून ते शेवटपर्यंत पुर्ण कुराण ऐकले जाते. कुराणमध्ये तीस पारे असून ६ हजार ६६६ आयाती आहेत. त्यामध्ये ११४ सुरते (श्लोक) आहेत. शहरात साडेचारशेपेक्षा जास्त मशिदींमध्ये तरावीची नमाज रोज वीस रकाअत व इशाचीही नमाज १७ रकात असून एका रात्रीत ३७ रकात नमाज पठण होणार आहे. वर्षातून एकदा तरावीची नमाज कुराणच्या आयातीसोबत ऐकणे व पठण करणे सुन्नत मानले जाते.
शहरातील व्यापारी व डॉक्टर, मेडीकल यांच्यासाठीही तरावीसाठी रात्री दहानंतर नमाज सुरु होते. महिला भगिनी हाफीज असलेल्या महिलेसोबत नमाज पढवितात. येथील अन्सार जमातखान येथे सहा दिवसाची तरावीची नमाज पठण केली जाते.
काही मशिदींमध्ये दहा दिवस व २६ दिवसापर्यंत ही नमाज कुराणच्या आयतीत पठण होत असल्याची माहिती जमिएत ए उलेमाचे सचिव मौलाना इम्तियाज एकबाल व मुफ्ती इम्तियाज फलाही यांनी दिली.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
तरावी पठण धार्मिकदृष्ट्या महत्वाचे
तरावीचे नमाज पठण धार्मिकदृष्ट्या महत्वाचे मानले जाते. कुराणचे प्रत्येक आयात ऐकल्यावर वेगळाच आनंद मिळतो. कुराण पठणातून धार्मिक बाबींचे महत्व समजतानाच समाधान मिळते.
रमजान पर्वासाठी मालेगाव सज्ज
मुस्लीम बांधवांचे रमजान पर्व शुक्रवारपासून (ता.२४) सुरु होणार आहे. याचबरोबर रमजानच्या उपवासाला (रोजा) सुरुवात होणार आहे. आगामी महिनाभर शहरातील मुस्लीम बहुल असलेल्या पूर्व भागाची दिनचर्या बदलणार आहे.
गुरुवारी (ता.२३) सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने शुक्रवारपासून रमजान पर्वाला सुरवात होईल. पहिला उपवास चौदा तासाचा असेल. महिन्याभरात रोज सहेरीच्या वेळ कमी होऊन रोजा सोडण्याच्या वेळेत वाढ होईल. येथे यंत्रमाग व्यवसाय तेजीत असल्याने दोन वर्षानंतर रमजान पर्वात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
येथील जुना-आग्रा रोड, भिक्कु चौक, इकबाल डाबी, आझाद नगर, मोहम्मद अली रोड, चंदनपुरी गेट, मच्छिबाजार, कुसुंबा रोड, सरदार चौक, किदवाई रोड, पेरी चौक आदी भागात महिनाभर विशेष बाजार भरणार आहे. या बाजारात पाव (नान), फळे, भाजीपाला व खाद्यपदार्थ आदींची रेलचेल असते.
रमजान पर्वामुळे महिनाभर पूर्व भागातील दिनचर्या बदलणार आहे. भल्या पहाटेपासून शहरात गजबज वाढणार आहे. रमजान पर्वासाठी मालेगाव सज्ज झाले आहे. कोरोना निवळल्याने व यंत्रमागाचा खडखडाट वाढल्याने यावर्षी रमजान पर्वात विक्रमी उलाढाल होऊन शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.