Ramadan Festival : रमजान पर्वात महिनाभर किंवा शेवटच्या दहा दिवसांत मशिदीमध्ये राहून इबादत (उपासना) केली जाते त्यास एतेकाफ संबोधले जाते. दावते इस्लामी इंडिया (हिंद) यांच्यातर्फे वडाळा गाव येथील गौसिया मशीद आणि सिडको येथील फिरदोस मशीद येथे एतेकाफची उपासना होत आहे.
त्यात ६० मुस्लिम बांधव महिनाभरासाठी तर ३५ बांधव दहा दिवसांसाठी एतेकाफमध्ये बसले आहे. ईदचा चंद्र दर्शन घडताच त्यांच्या एतेकाफची सांगता होणार आहे. (Ramadan Festival Worship of 60 Muslim brothers for month in Etikaf nashik news)
इस्लाम धर्मात रमजान महिन्यास विशेष महत्त्व आहे. रोजा, नमाज, कुराण शरीफ पठण करणे अशा विविध प्रकारच्या उपासना महिनाभर काटेकोरपणे केल्या जातात. त्यात एतेकाफ उपासनेलाही महत्त्व आहे.
महिनाभर किंवा रमजान पर्वाचे शेवटचे दहा दिवस मशिदीमध्ये राहून उपासना केली जाते. एतेकाफमध्ये बसणारा व्यक्ती जितक्या दिवसांसाठी बसला आहे. तितके दिवस मशिदीमध्येच नमाज आणि कुराण शरीफ पठण करणे, रोजा करणे आदी विविध धार्मिक विधी मशिदीमध्येच केल्या जातात.
त्यांचा महिनाभर किंवा दहा दिवस उपासनेसाठी बसलेल्या व्यक्तींच्या वेळेनुसार बाहेरील जगताशी त्यांचा संपूर्ण संबंध तुटलेला असतो. केवळ अल्लाची उपासना हेच एकमेव लक्ष असते. त्यानुसार दावते इस्लामी इंडिया (हिंद) यांच्यातर्फे वडाळागाव येथील गौसिया मशीद आणि सिडको येथील फिरदोस मशीद येथे एतेकाफचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
गौशिया मशिदीमध्ये ६० तर सिडको येथील फिरदोस मशिदीमध्ये ३५ मुस्लिम बांधव दावते इस्लामी इंडिया (हिंद) यांच्यातर्फे वडाळा गाव येथील गौसिया मशीद आणि सिडको येथील फिरदोस मशीद येथे एतेकाफमध्ये बसले आहे.
त्यांच्याकडून मशिदीमध्ये धार्मिक विधीसह धार्मिक प्रवचन होत आहे. पुरातन काळापासून एतेकाफची संकल्पना चालत आली आहे. ती आजही अविरत सुरू आहे. रमजान ईदचे चंद्र दर्शन घडताच सर्वजण एतेकाफमधून बाहेर पडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.