Ramazan Festival : QR कोड प्रणालीतून जकात दान; जकात देणाऱ्यांची माहिती गुप्त

A QR code shared on social media with content such as Donate Your Zakat from a specific organization.
A QR code shared on social media with content such as Donate Your Zakat from a specific organization.esakal
Updated on

जुने नाशिक : इस्लाम धर्मात रमजान महिन्यात जकात (दान) देण्यास अतिशय महत्त्व आहे. गरजू मुलांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था तसेच गरजू नागरिकांपर्यंत मदत देणाऱ्या सामाजिक संस्था माध्यमातून जकात पोचवली जाते.

जकात रक्कम दान देताना पारदर्शी प्रक्रिया असावी. यानिमित्ताने अशा संस्थांकडून क्यूआर कोड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्या माध्यमातून थेट संस्थेच्या खात्यांमध्ये रक्कम पडत असल्याने कोणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता भासत नाही. (Ramazan Festival Zakat donation through QR code system Information of Zakat payers confidential nashik news)

जकात देताना एका हाताने दिली तर दुसऱ्या हातास कळू नये, कुणाची भावना दुखवू नये. अशा पद्धतीने जकातीची रक्कम दान दिली जाते. सध्याच्या ऑनलाइन युगात बहुतांशी धनाढ्य मुस्लिम बांधवांकडून ऑनलाइन प्रणालीचा वापर केला जात आहे.

त्यामुळे जकात देणाऱ्यांची माहिती गुप्त राहण्यास मदत होत आहे. याशिवाय दिलेल्या दान रकमेचा घोळ होत नाही. याची शाश्वती संबंधितांना होत आहे. त्यासाठी धार्मिक आणि सामाजिक संस्थांनी त्यांचा विशिष्ट प्रकारचा क्यूआर कोड तयार केला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सर्वत्र प्रसारित करण्यात आला आहे. मुस्लिम बांधव तो क्यूआर कोड स्कॅन करून जकात दान करत आहे. त्यामुळे जकातीची रक्कम थेट संबंधित संस्थेच्या बँकेत वर्ग होत आहे. त्यातून गरजूंची उत्तमरीत्या मदत होत आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

A QR code shared on social media with content such as Donate Your Zakat from a specific organization.
Rahul Gandhi : त्यांनी राहुल गांधी यांना देऊ केले अयोध्येच्या हनुमानगढीतील घर!

जकात देणे कोणास अनिवार्य?

जकात अर्थात कर असा अर्थ होत असतो. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर सरकारला ज्या पद्धतीने कर दिला जातो. त्याच पद्धतीने सोने, चांदी, रोख रक्कम असलेल्या व्यक्तीने त्यावर गरजूंचादेखील अधिकार आहे.

अशी समज ठेवून त्यावरील कर अर्थात विशिष्ट रक्कम दान करणे म्हणजेच जकात देणे होय. लाखांची रोख रक्कम, साडेसात तोळे सोने, तसेच साडेबारा तोळे चांदी असणाऱ्या व्यक्तीने जकात देणे अनिवार्य आहे. डोक्यावर कर्ज असलेल्या व्यक्तींना जकात देता येत नाही.

A QR code shared on social media with content such as Donate Your Zakat from a specific organization.
Nashik News: नैसर्गिक नाल्यांवर अनधिकृत बांधकामे; पावसाचे पाणी रस्ते, शेतीमध्ये साठण्याचे प्रमाण वाढले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()