देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार घेऊन आम्ही पुढे जात असताना दुसऱ्यांच्या आधारापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहोत. (ramdas athawale statement about Future course of party nashik news)
किती दिवस कुबड्या घेणार, याचाही विचार करणे गरजेचे आहे, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शनिवारी (ता. २५) येथे पक्षाची आगामी काळातील वाटचाल कशी असेल, याबाबत संकेत दिले. घटनेतील मार्गदर्शक तत्त्वानुसारच निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील सर्वांत मोठे जैन मंदिर असलेल्या लॅम रोड परिसरातील कलापूर्णम तीर्थस्थानातला भेट देण्यासाठी श्री. आठवले देवळालीत आले होते, त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला.
ते म्हणाले, की केंद्रात, राज्यात आमची भाजप व शिवसेनेबरोबर युती असून आगामी लोकसभा, विधानसभेसह स्थानिक पातळीवर महापालिका, पालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका यादेखील महायुतीच्याच माध्यमातून लढविण्यात येतील.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
रिपब्लिकन पक्ष आता व्यापक झाला असून, अनेक जाती धर्माचे लोक या पक्षात सहभागी होत आहेत. नागालँड, मेघालय, त्रिपुरासारख्या राज्यातही आमच्या पक्षाला जनाधार मिळत आहे. पण डॉ. आंबेडकरांचे विचार पुढे नेत असताना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहोत. किती दिवस कुबड्या घेणार, हे ठरविण्याची वेळ आता आली आहे.
२ एप्रिलला महावीरांची जयंती आहे, त्या दिवशी देशातील ५० शहरात एक लाख लोक अहिंसा रनसाठी सहभागी होणार आहेत. १६५ मार्चला आजादी का सुवर्णमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत आसाममध्ये रॅली काढण्यात येणार आहे. यात तीस हजारांवर लोक सहभागी होणार आहेत.
‘संविधान खतरे में है, हा काँग्रेस व विरोधकांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटा ठरविला आहे. राज्यातील कसबापेठ व चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना व रिपाइं युतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावाही त्यांनी केला.
पर्यटन यादीत समावेश करू
मनपातील समाजमंदिराचे भाडे, देवळाली रेल्वेस्थानकावर पूर्वी थांबणाऱ्या सर्व गाड्यांना पुन्हा थांबा देणे, भगूर येथील स्वा. सावरकर स्मारकाप्रमाणे देवळालीतील जैन समाजाचे कलापूर्ण तीर्थ व शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ज्ञानमंदिर यांचा समावेश जिल्हा पर्यटन मंडळाच्या यादीत करण्याबाबत राज्य शासनाला सूचना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.