Uniform Civil Code : कुठल्याही रुढी-परंपरांना संविधानाच्या पुढे ठेवता येणार नाही. समान नागरी कायदा हा विवाह, विवाह विच्छेदन, पोटगी, स्त्रियांनाही समान वारसा हक्क, दत्तक घेण्याचा अधिकार याच विषयांना सामावून घेतो.
या व्यतिरिक्त फक्त समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. (Ramesh Patange statement on Rumors about Uniform Civil Code to create discord nashik news)
त्यांना काहीही आधार नाही. शाहबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पर्सनल लॉवर ताशेरे ओढले असल्याचे मत पद्मश्री रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाशिक शहर गोदावरी शाखा यांच्यातर्फे शनिवारी (ता. २९) सावरकरनगरमधील विश्वास गार्डन येथे ‘समान नागरी कायदा’ या विषयावर ते बोलत होते.
कायदेतज्ज्ञ नचिकेत जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर सहसंघचालक डॉ. विजयराव मालपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. मृण्मय जोशी यांनी प्रास्ताविक केले. आदित्य पतोंडीकर यांनी सामूहिक गान केले. गोदावरी शाखा कार्यवाह पवनेश कोठावदे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रमेश पतंगे म्हणाले, की संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे अशा प्रकारचे कुठल्याही धर्मातील पर्सनल लॉ संविधानाच्या विरोधातील आहेत. असे स्पष्ट संकेत सर्वोच्च न्यायालयाने देऊनही फक्त ‘व्होट बँक’साठी राज्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना अनेकदा धुडकावून लावल्या.
सरकारच्या या निर्णयाविरोधात केरळचे विद्यमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, हे उदाहरण पथदर्शक ठरले.
या विधेयकाला धार्मिक रंग न देता विशेषतः स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी या विधेयकाकडे पाहावे आणि त्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. सिद्धार्थ रहाणे, युवराज वाईकर, कैलास देसले, जयेश जोशी, रवींद्र बेडेकर, भूषण आहिरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सार्थक गोविलकर यांनी वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.