रामसेतूचे नाट्य दिवसेंदिवस रंगतदार; वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा फलक गायब

board is missing from ramsetu latest marathi news
board is missing from ramsetu latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेल्या रामसेतूवरील (Ramsetu) वाहतूक प्रशासनातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेकायदा ठरविली खरी. परंतु त्यानंतर काही वेळातच अज्ञाताने हा फलक काढून थेट यंत्रणेलाच आव्हान दिले आहे. आता तर पुलावरील बॅरीकेंटिंग बाजूला करून पायी सोडाच दुचाकीही धावू लागल्याने पुलाचा धोका टळला का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (RamSetu Traffic hazard sign missing nashik Latest marathi news)

मागील आठवड्यातील पुराच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांसह महापालिका आयुक्तांनी रामसेतू पुलाला भेट देत पुलासह पूरस्थितीची पाहणी केली. त्या वेळी जुना व नवा पूल यांच्या मध्यभागी पडलेल्या चिरा पाहून, तसेच वाहून गेलेला स्लॅब पाहून हा पूल संबंधितांनी धोकादायक ठरविला.

त्यानंतर संबंधितांच्या उपस्थितीतच पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेटिंगद्वारे बंदीस्त करण्यात आले. एवढेच नव्हे, तर दुतर्फा सदर पूल धोकादायक असल्याचा फलकही लावण्यात आला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांची पाठ फिरताच दोन्ही बाजूला लावण्यात आलेला कापडी बोर्ड व बॅरीकेटिंगचा काही भाग हटविण्यात येऊन लावण्यात आलेला कापडी बोर्डही फाडून टाकण्यात आला.

board is missing from ramsetu latest marathi news
काझी गढीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादरच्या सूचना

पोलिसांचाच विरोध

हा पूल सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी उपयुक्त असल्याचे कारण देत मध्यंतरी पोलिसांनीच या पुलाच्या पाडण्याच्या कामाला विरोध केला होता. त्यामुळे जुना पूल जाऊन या ठिकाणी नव्याने स्मार्ट पूल बनणार का, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

चार महापूर व असंख्य लहान- मोठे पूर अनुभवलेला या पुलाच्या जागी एकतर नवा पूल व्हावा, अन्यथा डागडुजीने त्याला भक्कमपणा आणावा, अशी अपेक्षा केली जाते. एकीकडे स्मार्टसिटीचे अधिकारी कोणत्याही परिस्थितीत पूल होणारच असे सांगताच, तर दुसरीकडे नवीन पुलाच्या कामालाही विरोध होतो. हे सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे आहे, एवढे नक्की.

board is missing from ramsetu latest marathi news
Nashik : बीट मार्शलमुळे मोठा अनर्थ टळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()