Ramzan Eid : मुस्लिम बांधवांकडून घरोघरी, मशिदीमध्ये नमाजपठण; ‘शब- ए-कद्र’ उत्साहात

Electric lighting on the mosque on the occasion of 'Shab-e-Qadr'.
Electric lighting on the mosque on the occasion of 'Shab-e-Qadr'.esakal
Updated on

Ramzan Eid : मुस्लिम बांधवांकडून ‘शब- ए-कद्र’ (बडी रात) मंगळवारी (ता.१८) उत्साहात साजरी झाली. मुस्लिम बांधवांकडून घरोघरी तसेच मशिदीमध्ये नमाजपठण केले, कुराण, फातेहा पठन करत संपूर्ण रात्र इबादत करण्यात आली. (Ramzan Eid 2023 Prayers by Muslim brothers from house to house mosque Shab e Qadr excitement nashik news)

रमजान पर्वातील पवित्र शब-ए-कद्र (बडी रात) चे विशेष महत्त्व आहे. लैलेतुल कद्र असाही या रात्रीचा उल्लेख केला जातो. मंगळवारी मुस्लिम बांधवांकडून ‘शब-ए-कद्र’ निमित्त रात्रभर इबादत (उपासना) करत विशेष दुवा करण्यात आली.

याच रात्री कुराण शरीफ पृथ्वीवर अवतरले होते. त्यानिमित्ताने रमजान पर्वात घरोघरी तसेच मशिदीमध्ये पठण करण्यात येत असलेले कुराण शरीफ वाचन पूर्ण करण्यात येऊन त्याचे समापन करण्यात आले.

मृत पूर्वजांना पठण केलेले कुराण शरीफ समर्पित करण्यात आले. विशेष फातेहा पठन झाले. शहराच्या विविध मशिदीमध्ये नमाजपठण, कुराण, फातेहा पठन, नाते- ए- मैफल, धार्मिक प्रवचन झाले. अशाप्रकारे रात्रभर मुस्लिम बांधवांकडून इबादतमध्ये रात्र घालविण्यात आली.

दरम्यान नमाजपठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी विशेषतः तरुणांनी बडी दर्ग्यासह, आनंदवली, पांडव लेणी, अस्वली तसेच शहराच्या विविध दर्ग्यामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. बडी दर्ग्यासह विविध मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Electric lighting on the mosque on the occasion of 'Shab-e-Qadr'.
Nashik News : भररस्त्यात थांबविली जातात वाहने; दिंडोरी नाका परिसरात बेशिस्त वाहतूक

मशिदीमध्ये नमाज पठणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता विश्वस्तांकडून अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांकडून विशेष खबरदारी घेत अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रमजान पर्वात तराविहीच्या विशेष नमाज दरम्यान कुराण शरीफ तोंडी पठण करणाऱ्या हाफीज- ए- कुराण तसेच मशिदीमध्ये वर्षभर ज्यांच्या नेतृत्वात नमाज पठण केली जाते, असे मौलवींचा विशेष सत्कार करण्यात आला.

शब- ए- कद्र संपन्न होताच तीन ते चार दिवसात रमजान ईद साजरी केली जाते. शुक्रवारी चंद्रदर्शन घडल्यास शनिवारी ईद साजरी होणार असल्याची शक्यता असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ईदच्या खरेदीला वेग आला आहे.

Electric lighting on the mosque on the occasion of 'Shab-e-Qadr'.
Recruitment : सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात हंगामी पदभरती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.