Ramzan Festival : पावासामुळे ईदची खरेदी करणाऱ्यांची तारांबळ; खरेदी न झाल्याने व्यवसायांवर परिणाम

Police patrolling the Iftar market in Dudh Bazar area.
Police patrolling the Iftar market in Dudh Bazar area.esakal
Updated on

Ramzan Festival : अवघ्या सहा दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपली आहे. गेल्या दोन वर्षानंतर रमजान ईद उत्साहात साजरी होईल या आशेने मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दुसरीकडे मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे ईदवर पावसाचे सावट दिसून येत आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १५) व रविवारी (ता. १६) सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. (Ramzan Festival Eid shoppers rush due to rain Impact on businesses due to non purchase nashik news)

मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ईदच्या तयारीस वेग आला आहे. शुक्रवारी (ता.२१) चंद्रदर्शन घडल्यास शनिवारी (ता.२२) ईद होण्याची शक्यता आहे. बाजारपेठ विविध प्रकारच्या खरेदीसाठी गजबजलेली आहे.

असे असले तरी दुसरीकडे रमजान ईदवर पावसाचे सावट दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरणासह शहरात सतत अवकाळी पाऊस पडत आहे. आणखी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे.

अशीच परिस्थिती कायम राहिल्यास ईदच्या उत्सवावर विरजण पडण्याची शक्यता आहे. गत दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावाचे ईद उत्सवावर संकट घोंघावत होते. सरकारकडून देखील निर्बंध लावण्यात आले होते. यंदा परिस्थिती सामान्य असल्याने निर्बंधमुक्त ईद साजरी करण्याचा आनंद मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह निर्माण करत आहे.

अवकाळी पावसाच्या हजेरीने मात्र त्यांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडणार की काय अशी स्थिती आहे. ईदच्या दिवशी पाऊस झाल्यास सलग तिसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने ईद साजरी करण्याची वेळ मुस्लिम बांधवांवर येणार आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Police patrolling the Iftar market in Dudh Bazar area.
Nashik News: बागलाण तालुक्यात तातडीने सरसकट पंचनामे करावेत; शेतकर्‍यांचे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे खरेदी जाण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्याचा परिणाम व्यवसायांवर झाला आहे. खरेदी-विक्री घटल्याने व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

मशिदीमध्ये अतिरिक्त व्यवस्था

दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात ईदगाह मैदानावर सामुदायिक रमजान ईदची नमाज होणार आहे. ईदच्या दिवशी पाऊस झाल्यास ईदची नमाज ईदगाहवर पठन होणे शक्य होणार नाही. पावसाची शक्‍यता लक्षात घेता शहराच्या सर्वच मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांना नमाज पठणासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.

कुणाची ईदची नमाज सुटता कामा नये. यासाठी विविध मशिदीमध्ये नमाजची वेगवेगळी वेळ ठेवण्यात आली आहे.

Police patrolling the Iftar market in Dudh Bazar area.
Dhule News : ‘एमजेपी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘दांडी’ने प्रश्‍न कायम! अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.