नाशिक : रविवारी (ता १२) रंगपंचमी असल्याने या दरम्यान, फुग्यांमध्ये रंगाचे पाणी भरून ते फेकण्याची पद्धत गेल्या काही वर्षात रूढ झाली आहे. परंतु त्यामुळे अनेकांना इजा झाली असून, वाहनचालक यामुळे गंभीररीत्या जखमी झाले आहे.
त्यामुळे अशारीतीने रंगाने भरलेले फुगे फेकण्यावर बंदी घालण्यात आली असून, या आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिला आहे. (Rangpanchami Festival Warning of Deputy Commissioner of Police on throwing colorful balloons nashik news)
होळीचा सण सोमवारी (ता. ६) शहरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर भारतासह मुंबईमध्ये धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा केला जातो, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये होळीनंतर पाच दिवसांनी येणाऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.
त्यानुसार रविवारी (ता. १२) रंगपंचमी नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यासाठी पेशवेकालीन रहाडी उघडण्यात येऊन युवकवर्ग रंगपंचमीचा आनंद घेतात.
दरम्यान, काही प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये फुग्यांमध्ये रंगांचे पाणी भरून ते फुगे फेकून मारले जाण्याची पद्धत रूढ झाली. यामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. फुग्यामुळे अनेकांना इजा पोचली आहे तर धावत्या वाहनचालकांवर असे फुगे फेकल्याने अपघात होऊन गंभीर स्वरूपाच्या घटनाही घडल्या आहेत.
त्यामुळे अशाप्रकारे फुगे फेकण्यावर नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये बंदी घालण्यात आली. यानुसार अशाप्रकारे रंगाचे फुगे फेकून मारण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
त्यामुळे रंगपंचमीचा आनंद घेताना त्यात विघ्न येऊ नये यासाठी रंगपंचमीचा आनंदोत्सव साजरा करा, परंतु आदेशाचे उल्लंघन न करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
परवानगी आवश्यकच
भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्यातून रहाडी व शॉवर डान्सच्या आयोजकांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. महापालिका व अग्निशमन दलानेही ना हरकत दर्शविली असून, विशेष शाखेत सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर सर्व मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. यासह विनापरवानगी सार्वजनिक कार्यक्रम साजरा झाल्यास संबंधितांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
"रंगपंचमीच्या पाश्र्वभूमीवर रंगांचे पाणी भरून फुगे फेकले जातात. त्यामुळे अशाप्रकारांवर पोलिसांचे बारीक लक्ष असेल. लहान मुलांनीही फुग्यांचा वापर करू नये. यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष द्यावे. रहाड, शॉवर डान्स याठिकाणी सीसीटीव्ही आयोजकांनी लावलेले आहेत."
- किरणकुमार चव्हाण, उपायुक्त, परिमंडळ-१
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.