Raosaheb Danve : मोदींची 9 वर्षातील कामे जनतेपर्यत न्या : दानवे
Raosaheb Danve : भाजप सरकारने २०१४ ते २०२३ पर्यंत लोकोपयोगी काय कामे केली आहेत, हे कार्यकर्ता, मोर्चाच्या सर्वं पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन सांगायचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे केले.
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणच्या संयुक्त मोर्चा संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. (raosaheb danve statement narendra modi 9 years of work nashik news)
प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटन तसेच कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, केदा आहेर, रंजना भानसी उपस्थित होते.
श्री. दानवे म्हणाले, देशातील ४० कोटी लोकांना सरकारने मोफत बॅंक खाते उघडून दिले. अकरा कोटी लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे दिली आहे. घरात वीजही दिली. महिलांसाठी ९ कोटी उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन दिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कोविड काळात ८० कोटी लोकांना पाच किलो धान्य वाटप केले. जगातील विविध देशांची आर्थिक परिस्थिती खालावत असताना आपली टिकून राहिली आहे याचे श्रेय मोदींना जाते. लोकहिताच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवाव्या यासाठी या संयुक्त मोर्चा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. लोढा यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा अपमान केला होता, यामुळेच भाजपा शिवसेना सरकार स्थापन करून फडणवीसांनी बदला घेतला आहे. नाशिक शहर हे धार्मिक तसेच आध्यात्मिक आहे. यासाठी येत्या काही दिवसात नाशिक शहरात नाशिक फेस्टिवलचे आयोजन केले जाईल.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची संवाद साधला. कार्यक्रमास दिनकर पाटील, अनिल जाधव, महेश हिरे, सतीश सोनवणे, भगवान दोंदे, जगन पाटील, सतीश कुलकर्णी, डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, विजय साने, छाया देवांग, पुष्पा आव्हाड यांच्यासह आजी माजी नगरसेवक तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.