अल्पवयीन युवतीवर अत्याचार; आरोपीस जन्मठेप

Rape of minor girl latest marathi news
Rape of minor girl latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : अल्पवयीन युवतीवरील अत्याचारप्रकरणी (Rape pf Minor Girl) २१ वर्षीय आरोपीस नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप (Life Imrisonment) व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. किसन जयप्रकाश नागर (रा. सिडको) असे आरोपीचे नाव आहे.

सप्टेंबर २०१६ मध्ये अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन युवतीवर आरोपी किसन नागर व त्याच्यासह इतर पाच विधिसंघर्षित बालकांनी सोशल मीडियाद्वारे झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अत्याचार केला होता. (Rape of minor girl Life imprisonment to accused nashik Latest Crime News)

या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात किसन नागर व इतर पाच संशयित विधिसंघर्षित बालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक वैशाली शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास करत संशयितविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

Rape of minor girl latest marathi news
आयुक्त रमेश पवार यांची 120 दिवसांतच बदली; शिंदे-फडणवीस सत्तास्थापनेची परिणती

खटल्याची जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक तीनच्या न्यायाधीश मृदुला भाटिया यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे, पंच, साक्षीदारांनी दिलेली साक्ष व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून या गुन्ह्यातील आरोपी किसन नागर यास जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे वकील आर. एम. कोतवाल यांनी कामकाज पाहिले.

Rape of minor girl latest marathi news
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे ‘महाविकास’ला दणक्यामागून दणके!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.