Shravan: ‘अधिक श्रावणा’चा यंदा 19 वर्षांनंतर दुर्मिळ योग! उपवास व विष्णूला प्रिय विधी करण्यास धार्मिक महत्त्व

Ashadh Maas 2023
Ashadh Maas 2023 esakal
Updated on

Adhik Maas: हिंदू धर्मांत अधिक मासाला मोठे महत्त्व आहे. यालाच मलमास, पुरूषोत्तम मास किंवा ग्रामीण भागात धोंड्याचा महिनाही म्हटले जाते. यंदा तब्बल १९ वर्षांनंतर श्रावण महिन्यात अधिक मासाचा दुर्मिळ योग आलेला आहे. (rare yoga of Adhika Shravan this year after 19 years Religious importance of fasting and performing rituals dear to Vishnu nashik)

आपल्याकडे चांद्रमासाला प्रमाण मानले जाते. ज्या चांद्रमासात सूर्यसंक्रांत होत नाही, त्याला अधिक मास म्हटले जाते. तर, ज्या चांद्रमासात दोन सूर्यसंक्रांती होतात त्यांना क्षयमास म्हणतात. साधारणत: फाल्गुन ते अश्‍विन हे मराठी महिने अधिकमासात येतात.

या काळात एकभुक्त व्रत म्हणजे, उपवासाचेही महत्व असून, विष्णूला प्रिय असलेले विधी करण्याला धार्मिक महत्त्व आहे. यात रविवार, द्वादशी, पोर्णिमा, अमावस्या, यतीपाठ योग, वैध्रती हा पर्वकाळ सांगण्यात आला आहे.

याकाळात दानधर्माला मोठे महत्व असते. दरम्यान, श्रावण महिन्यात आवर्जून केली जाणारी व्रत वैकल्ये मात्र अधिकमासाऐवजी १७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नित्य (नीज) श्रावण महिन्यात करावीत. त्याचकाळात खऱ्या अर्थाने श्रावण महिन्यातील नियम पाळावेत, असे सांगितले जाते.

अधिकमासात कोणती कामे करू नयेत0

अधिकमासात काम्यकर्माचा आरंभ किंवा समाप्ती करू नये. महादान, अपूर्व देवदर्शन, गृहारंभ, वास्तुशांती, संन्यासग्रहण, नूतनव्रतग्रहणदीत्रा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा हे विधी करू नयेत, असे शास्त्रात सांगितले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ashadh Maas 2023
Shravan Maas 2023: भगवान महादेवांना श्रावण महिना का आहे प्रिय

अपूपदानाला महत्त्व

अधिकमासात अपूपदानाला म्हणजे ज्याला छिद्रे आहेत, अशा गोष्टींच्या दानाचे महत्व सांगितले आहे. यात अनारसे, बत्ताशे यांचा समावेश होतो. विष्णूदेवाची मुख्य ३३ नावे आहेत. त्यामुळे ३३ या संख्येतील दानाला महत्व आहे. जावई व मुलगी यांना भगवान विष्णू व लक्ष्मीचे रूप मानण्यात आले असून, त्यांना अनारसे, बत्ताशे व अन्य संसारपयोगी गोष्टी दान करण्याची पद्धत आहे.

म्हणून अधिक मास...

अधिक मास साधारण ३२ महिन्यांनी येतो. पृथ्वीला सुर्याभोवतीच्या एका भ्रमणास ३६५ दिवस लागतात, यालाच सौरवर्ष म्हणतात. सौरवर्ष व चांद्रवर्ष यात दरवर्षी सव्वा अकरा दिवसांचे अंतर पडते. हे अंतर अधिक महिन्याने पूर्ववत होते.

यारितीने आपल्या पंचांगात सौरवर्ष व चांद्रवर्ष यांच्यात मेळ घालण्यात आला आहे. तो धार्मिक कार्यासाठी पोषक आहे. योगपर्व, शुभाशुभ दिवस, अधिकमास यामुळेच होतात. एका वर्षात दोन अयने, सहा ऋतू व बारा चांद्रमास होतात. प्रत्येक चांद्रमासात रवीची संक्रांत असते. यावरून चांद्रमासाची नावे पडली आहेत.

"हिंदुधर्मात श्रावण महिन्याला अधिक महत्त्व आहे. या मासात रोज एकवेळा श्रीविष्णू सहस्त्रनाम म्हणावे किंवा आपल्या वास्तुमध्ये ते ऐकावे. या काळात आपल्या वास्तुत श्रीविष्णूयाग करावा. याकाळात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत."-डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक

"अधिकमासात केलेल्या सेवेचे फल हे इतर मासापेक्षा अधिक असते. या काळात विष्णूदेवता अधिक फल देणारी असल्याने बत्ताशे, अनरसे दान करावेत अथवा गाईस महिनाभर गोग्रास देणे पुण्यकारक आहे."-पं. वैभव दीक्षित, सचिव, गंगा गोदावरी पुरोहित संघ

Ashadh Maas 2023
Ajit Pawar Latest Update : राष्ट्रवादीतील महाभारत नेत्यांसह कार्यकर्तेही 'वेट अ‍ॅण्ड वॉच'च्या भूमिकेत; ठाकरेंच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.