Chilli Rate Hike : मसाल्याच्या लाल मिरचीला सोन्याचा भाव! दरात चालूवर्षी 20 टक्क्यांनी वाढ

Red Chillies
Red Chilliesesakal
Updated on

बिजोरसे (जि. नाशिक) : आठ ते दहा दिवसापासून पावसाने उघडीत दिल्याने ढगाळ वातावरण कमी झाले. यामुळे कसमादे पट्ट्यात ग्रामीण भागात गृहिणींकडून वाळवणाचे पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू झालेली आहे.

याच बरोबरच वर्षभर घरात लागणारा तिखट मसाला तयार करण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्याच्या हंगामात मागणी असलेल्या लाल मिरचीचे यंदा जवळपास २० टक्क्यांनी वाढले आहेत शिल्लक मिरचीचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत ९० टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे सध्या लाल मिरचीचे दर तेजीत आहेत. (rate hike spiced red chillies Rate increase by 20 percent this year nashik news)

आठ-दहा दिवसापासून ढगाळ वातावरण कमी झाल्याने व कडक ऊन पडत असल्याने महिला वर्गांची पुन्हा वाळवण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी मार्च ते जून महिन्यापर्यंतचा कालावधी हा कडक उन्हाचा असतो.

याच कालावधीत मसाला इतर पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु मागणी असूनही आवक घटल्यामुळे मिरचीचे दर यावर्षी वाढल्याचे व्यापारी सांगत आहे.

गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मिरचीच्या पिकांच्या तुडतुड्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी घटलेले आहे. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे भाव तेजीत आहेत. बाजारातील आवक वाढल्यानंतर ही दरातील तेजी कायम राहील असा अंदाज सांगितला जातो.

नंदुरबार त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. मात्र पिकांवर यंदाही तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Red Chillies
NMC Tax Recovery : गांधीगिरीतून एका दिवसात 11 लाखांची वसुली

मिरचीचे भाव (किलोमध्ये)

गावठी - ३०० रुपये
रेशमपट्टा - ६०० रुपये
काश्मिरी - ८०० ते ९०० रुपये
सपाटा - ६०० रुपये
रसगुल्ला - १००० रुपये

"मिरचीचे भाव हे वाढलेले आहेत. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, तुडतुडी किड यामुळे मिरची उत्पादनावर परिणाम झालेला आहे." - संजय हिरे (शेतकरी)

"मिरचीचे भाव गेल्यावर्षी पेक्षा थोडे वाढलेले आहे. त्याला कारण उत्पादन कमी झाले आहे. पण गृहिणींना बारा महिन्यासाठी म्हणजे खाण्याचे पदार्थ मिरची पासून केले जातात. मिरचीचे भाव वाढल्यामुळे खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे." -सुनील अमृतकर (मिरची व्यापारी)

Red Chillies
Natya Parishad Election : नाट्य परिषद निवडणूक वाद; ‘त्या’ चौघांचे सदस्यत्व रद्द होणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()