Pulses Rate Hike : अनियमित व असमाधानकारक पावसामुळे आवक घटल्याने परिणामी डाळींच्या दरांचा भडका झालेला आहे. दोन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या डाळींचे दर २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित बिघडल्याचे बघायला मिळते आहे.
गणेशोत्सवापासून आता पितृपक्ष व पुढे नवरात्रोत्सव असल्याने या कालावधीत बहुतांश नागरिकांकडून शाकाहाराला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सर्वसाधारणपणे किराणा मालाला मागणी वाढत असते. (rate of pulses increased by 20 percent nashik news)
तुलनेत डाळीचा पुरवठा होत नसल्याने दरवाढीचा सामना ग्राहकांना करावा लागतो आहे. या वर्षी पावसाने दीर्घकाळ दडी दिली होती. यामुळे शेती उत्पादन प्रभावित झालेले असून, संभाव्य टंचाई लक्षात घेता, आत्तापासून विविध मालाची आवक घटलेली आहे. प्रामुख्याने डाळींच्या आवकेवर परिणाम झाल्याचे दिसून येते असून, त्यामुळे दरांमध्ये वाढ झालेली आहे.
गव्हाच्या दरांमध्ये किरकोळ प्रमाणात वाढ झालेली असून, रवा व मैद्यासारख्या उत्पादनांचे दरही वाढले आहेत. आवक सुरळीत होईपर्यंत पुढील काही महिने दरांमध्ये तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
खाद्य तेलाचे दर स्थिर
एकीकडे दाळींसह धान्य व अन्य किराणा मालाच्या दरात वाढ झालेली आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून खाद्य तेलांचे दर स्थिर असल्याने महागाईच्या काळात सर्वसामान्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळालेला आहे. येत्या काळात दर स्थिर राहण्याचा अंदाज व्यावसायिकांकडून व्यक्त केला जातो आहे.
किराणा मालाच्या दरांची स्थिती अशी-
(प्रतिकिलो, रुपयांमध्ये)
वस्तु दोन महिन्यांपूर्वीचे दर सध्याचे दर
शेंगदाणा १३० १५० ते १६०
तूरडाळ १२० ते १३० १५० ते १६०
मूगदाळ १३० १८०
मसूर दाळ ७० ९० ते १००
भगर १२० १३०
साबुदाणा ७० ८० ते ९०
"आवक घटल्याने डाळींसह काही किराणा वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणीत काही प्रमाणात घट झालेली आहे. आवक सुरळीत होईपर्यंत दरांमध्ये तेजी कायम राहाण्याची शक्यता आहे." - शेखर दशपुते, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.