Nashik News: डॉक्टरांमध्येही बेरोजगारीचे प्रमाण अधिक! NMCत मानधन नियुक्तीसाठी 342 डॉक्टरांची मुलाखत

 doctor
doctor sakal
Updated on

Nashik News : वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारा डॉक्टर हा घटक देखील बेरोजगारीने बेजार झाला आहे. नाशिक महापालिकेत रिक्त पदांवर मानधनावर डॉक्टर व संबंधित पदे भरण्यासाठी मुलाखत घेतली जात आहे. ५६ जागांसाठी दोन दिवसात ३४२ डॉक्टर मुलाखतीला हजर राहिले.

मुलाखत देणाऱ्यांमध्ये बीएएमएस पदांसाठी २६६ डॉक्टर उपस्थित होते. एमबीबीएस पदासाठी सात तर दंत शल्य चिकीत्सकांच्या पदासाठी ५० डॉक्टरांनी मुलाखत दिली. (rate of unemployment among doctors higher Interview of 342 doctors for emolument appointment in NMC Nashik News)

महापालिकेचे रुग्णालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर कार्पोरेट हॉस्पिटलला लाजवेल अशा पद्धतीचे आहे. परंतु तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्याने रुग्णांना सुविधा पुरविता येत नाही. पाच मोठे व तीस शहरी आरोग्य केंद्र महापालिकेचे आहे.

त्यात आता नव्याने १०५ आरोग्य उपकेंद्र तयार करण्याचे काम सुरु आहे. वैद्यकीय विभागात विशेष तज्ज्ञांसह डॉक्टरांची सध्या १८९ पदे मंजूर असून त्यापैकी सध्या ६५ डॉक्टर कार्यरत आहे. या बिकट परिस्थितीत तातडीची बाब म्हणून डॉक्टरांसह तज्ज्ञ पदे मानधनावर भरण्यासाठी सध्या मुलाखत सुरु आहे.

यासाठी ५६ डॉक्टरांसह ९६ पदे मानधनावर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले. बीएएमएस डॉक्टरांच्या २० पदासाठी तब्बल ४६८ अर्ज आले आहेत. एमबीबीएसच्या १० जागांसाठी अवघे ७ अर्ज प्राप्त झाले.

दंत शल्यचिकीत्सकांच्या तीन जागांसाठी ८७ अर्ज आले. त्यात ५० डॉक्टरांनी मुलाखत दिली. शल्यचिकित्सक, भुलतज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ या पदांसाठी प्रतिसाद मिळाला नाही. तज्ज्ञ डॉक्टरांना ७५ हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाणार आहे.

 doctor
Maratha Reservation: पूर्व विभागात 1 हजार 807 कुणबी, 1 मराठा कुणबी नोंद! 3 दिवसात 1 लाखाहून अधिक नोंदींची तपासणी

पदनाम मंजुर पदे मुलाखतीला आलेले डॉक्टर

शल्यचिकित्सक २ २

अस्थिरोग तज्ज्ञ ४ ३

भुलतज्ज्ञ २ १

स्रीरोग तज्ज्ञ ५ ७

रेडिओलॉजिस्ट २ ०

बालरोग तज्ज्ञ ५ ५

नाक,कान घसा तज्ज्ञ २ १

दंतशल्य चिकित्सक ३ ५०

वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)१० ६

वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) २० २६६

परिचारिका २० ५१९

एएनएम २० ६९

 doctor
Nashik News: HALमधून विमानांची देखभाल व दुरुस्ती; ओझर ‘एचएएल’ व एअर बस कंपनीबरोबर करार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.