नाशिक : राजकारण- प्रशासनाचा हातात हात! रेशन दुकानदाराची अडवणूक

268 ration shop out of coverage in ratnagiri grains department suggest
268 ration shop out of coverage in ratnagiri grains department suggest
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : राजकीय वैमनस्यातून झालेल्या खोट्या प्रकरणी व प्रशासनावरील दबावामुळे शेतकरी सहकारी संघाने कळवाडी येथील स्वस्त धान्य विक्रीसाठी नियुक्त केलेल्या दुकानदाराला (सेल्समन) चौकशी, अहवाल, त्रुटींचे कारण देऊन ई- पॉस मशीन न देता धान्य वितरण वाटपास मनाई केली. सहा महिन्यांपासून होत असलेल्या छळाला कंटाळून तहसिलदारांनी अडवणूक केल्यामुळे हा प्रकार घडला आहे. आठ दिवसात न्याय न मिळाल्यास २२ मार्चपासून कुटुंबासह उपोषणाला बसू, असा इशारा कल्पना वाघ, सचिन वाघ या मायलेकांनी पत्रकार परिषदेत दिला.

न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा

श्रीमती वाघ यांनी मुलगा व सुनांसह पत्रकार परिषद घेऊन आपबिती कथन केली. सचिन वाघ यांनी गेल्या सहा महिन्यांपासून आपला छळ सुरु आहे. माझ्यासह कुटुंबियांचे स्वास्थ्य बिघडल्याचे सांगून तहसीलदार व स्थानिक पुरवठा विभागावर गंभीर आरोप केले. संघाने कळवाडीसाठी मिळालेला स्वस्त धान्य परवाना काही अटी- शर्तींवर दुकान चालवण्यासाठी कल्पना वाघ यांना दिला आहे. संघाने याविषयी तहसील कार्यालयाला कळविले. ८ सप्टेंबर २०२१ ला दुकान जोडणीचा आदेश झाला. मात्र, तहसिलदारांनी स्वाक्षरी करण्यास विलंब केला.
आदेश देण्यासाठी व समितीला देण्यासाठी संबंधितांनी पैसे घेतले. आदेश दिल्यानंतर २० टक्के माल भरण्याची परवानगी दिली. धान्य वाटपसाठी १६ फेब्रुवारीला ई पॉश मशीन दिले. दुसऱ्याच दिवशी १७ मार्चला धान्य वाटप सुरु असताना परवाना रद्द झाल्याचे तहसील कार्यालयाकडून कळविण्यात आले.

268 ration shop out of coverage in ratnagiri grains department suggest
नाशिक शहर बससेवेच्या 28 चालक-वाहकांचे निलंबन; महिलांना मिळणार संधी

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी मनाई आदेश दिल्यानंतरही धान्य वाटपासाठी परनानगी मिळालेली नाही. राजकीय वादातून गाव पातळीवरील कार्यकर्ते खोट्यानाट्या तक्रारी करतात. येथील प्रशासन संगनमत करुन त्यांच्या तालावर नाचते. आपल्याला न्याय न मिळाल्यास उपोषण, आत्मदहन यासह विविध मार्ग पत्करु, असा इशारा या मायलेकांनी दिला.

268 ration shop out of coverage in ratnagiri grains department suggest
दोद्धेश्वरला बिबट्याचा मुक्तसंचार; पंचक्रोशीत भीतीचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.