नाशिक : मुंबईतील मायानगरीतील तारेतारकांसाठी वीकेंड डेस्टीनेशन (weekend destination) म्हणून इगतपुरीतील रिसॉर्ट प्रख्यात आहे. यापूर्वीही अनेकदा इगतपुरीत पार्ट्या छाप्यामुळे चर्चेत आल्या आहेत. २०१७ आणि २०१८ अशा पार्ट्यावर पोलिसांनी छापे टाकले आहे. नुकत्याच इगतपुरीत बंगल्यात मुंबईतील चित्रनगरीशी संबंधित हाय प्रोफाइल हुक्का पार्टीवर छापा टाकून ग्रामीण पोलिसांनी २२ जणांना अटक केल्याचे प्रकरण काल (ता.२७) उघडकीस आले. आणि पुन्हा चर्चा सुरू झाली. वीकेंड लॉकडाउनकाळात स्काय व्हिला बंगल्यातील पार्टीत इराणी महिलेसह बिग बॉस फेम हीना पांचाळ हिच्यासह मनोरंजन क्षेत्रातील चार तारकांचा समावेश असल्याने दिवसभर सोशल मीडियावरही पोलिस कारवाईची धूम होती. (rave-party-raids-Igatpuri-resort-nashik-marathi-news)
स्थानिकांनाही थांगपत्ताही नसतो
पावसाळ्यात इगतपुरीत रिसॉर्टसह शनिवार व रविवार राज्यात वीकेंड लॉकडाउनमुळे हॉटेल आणि पर्यटनस्थळ बंद असून, खासगी बंगल्यावर लोकांच्या पार्ट्या होतात. रात्रीच्या मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांमुळे आसपासचे लोक तक्रारी करतात. पण जिथे कुठलेही ध्वनिक्षेपक नसतात तेथील पार्ट्यांबाबत मात्र स्थानिकांनाही थांगपत्ताही नसतो. त्यातून तक्रारी आल्यानंतर पार्ट्यांवर कारवाया होतात अन्यथा तक्रार नसल्यास सगळे आलबेल सुरू असते.
सिनेतारकांची पोलीस गाडीत वरात; स्थानिक नागरिकही अवाक
या प्रकरणात मुंबईत नायजेरिया महिलेलाही ताब्यात घेतले आहे. इगतपुरीतील बंगल्यात मुंबईतील तारकांची ही हाय प्रोफाइल रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे चारला ही कारवाई झाली. ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाई दहा पुरुष आणि १२ महिला, अशा एकूण २२ जणांना अटक केली. पार्टीत सुरवातीला हुक्का पार्टी असल्याचे सांगितले जात होते. मात्र दुपारी चारपर्यंत सुरू असलेल्या तपासात पार्टीत कोकेनसह अंमली पदार्थ सापडल्याचे पुढे आले. दुपारी चारला पोलिस गाडीत सगळ्यांना नेण्यात आले. पोलिसांनी अटक केलेल्या दहा पुरुष आणि १२ महिलांत हीना पांचाळ, विदेशी महिलांना पाहून स्थानिक नागरिकही अवाक झाले.
इराणी महिलेचा समावेश
महिलांत मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केलेल्या चार अभिनेत्रींचा समावेश आहे. त्यापैकी एक मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्रीचा समावेश आहे. बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेल्या हीना पांचाळ हिच्यासह एका इराण येथील एका विदेशी महिलेलाही पोलिसांनी अटक केली. पार्टीत सहभागी झालेले लोक चित्रपट दुनियेशी संबंधित असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता होती. दिवसभर ही पार्टी सोशल मीडियावरही जोरात होती. अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.