नरकोळ (जि. नाशिक) : घरगुती लोणचे तयार करण्यासाठी गावरान कैरीला पसंती असून या कैरीचे लोणचे टिकाऊ असते. बाजारात कैरी येण्यास प्रारंभ झाला आहे. यंदा पाऊस नसल्यामुळे खरेदी करण्यास ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसून येत नाही. पाऊस पडल्यानंतर वातावरणातील उष्णता कमी होईल. तेव्हाच लोणचं भरण्याची लगबग राहिल.
सध्या ऊन कडक असल्याने लोणचं खराब होण्याची भिती आहे. बाजारात कैरी विक्रीसाठी येत आहे. भावही आवाक्यात आहेत. मात्र ग्राहकाची कैरी घेण्यास उत्सुकता नाही. लोणच्यासाठी महागडा मसाला, तिखट, तेल, मिरची आदी वस्तू लागतात. त्यामुळे सध्यातरी लोणच्यासाठी शांतता आहे वर्षभर टिकेल यादुष्टीने लोणचे भरतात. यंदा कैरी सर्वत्र असल्याने आता पाऊस पडताच लोणचं भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानुसार आतापासूनच नातेवाईकांना लोणच कैरीबाबत विचारणा सुरू झाली आहे. यासाठी वर्षभर टिकेल, अशी कैरीसाठी नातेगोत्याचा सहारा मिळत आहे. या बाबीला ग्रामीण भागात वानोळा म्हणतात. यंदा कैरीचे भावही आवाक्यात आहेत.
लोणचे मसाल्यासाठी लागणाऱ्या वस्तु व भाव (पन्नास कैरीसाठी)
मोहरी दाळ : ५०० ग्रॅम- ७० रुपये
मेथी : ५० ग्रॅम - २० रुपये
लवंग, मिरी, हिंग, बडीशोप, हिराहिंग, हळद, दालचिनी, वेलदोडे, जायफळ, प्रत्येकी - २० रुपये
तेल : दोन किलो - ३५० रुपये
मिरची : एक किलो,१३० रुपये
कैरी (गावरान) - ३५० ते ४०० रुपये शेकडा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.