Nashik Police News : अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांची अंबड पोलिस ठाण्यात पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या तीन महिन्यांत प्रशासकीय कारण दाखवत दुसऱ्यांदा नियंत्रण कक्षात त्यांची बदली करण्यात आली. (Re appointment of Pramod Wagh in Ambad Police Station nashik news)
गेल्या आठवड्यात पवननगर परिसरात मध्यरात्री एका माजी नगरसेवकावर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका संशयिताने हवेत गोळीबार केला. याप्रकरणी तपास कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून निरीक्षक प्रमोद वाघ यांची तडकाफडकी बदली केल्याची सिडको परिसरात चर्चा होती.
प्रमोद वाघ यांची १ जुलै २०२३ ला अंबड पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाली. यानंतर त्यांनी अंबड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून हद्दीची माहिती जाणून घेत प्रत्यक्षात कामकाजाला सुरवात केली. कामकाज करत असतानाच त्रिमूर्ती चौकात सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू होते. याच काळात सकल मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्या कार्यालयाला पोलिसांच्या डोळ्यादेखत टाळे लावले.
एका सत्ताधारी विद्यमान आमदाराच्या कार्यालयाला पोलिसांसमोर टाळे लावून सुद्धा पोलिसांनी त्या कार्यकर्त्याच्या विरोधात लगेच कारवाई न केल्याने प्रमोद वाघ यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. या वेळी आमदार यांनी मध्यस्थी करत प्रमोद वाघ यांना पुन्हा अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्त केल्याचे बोलले जाते.
या प्रकाराला काही दिवस उलटत नाही, तोच पवननगर परिसरात मध्यरात्री दरम्यान एका माजी नगरसेवकावर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका संशयिताने हवेत गोळीबार केला. याप्रकरणी तपास कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र चार दिवसांनी त्यांची पुन्हा अंबड पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.