नाशिक रोड : मित्रमेळा संघटनेचे संस्थापक राजेंद्र ऊर्फ कन्नू ताजणे यांनी बिटको कोविड सेंटर (bytco covid center) येथे इनोव्हा कार चलवत रुग्णालयाच्या काचा फोडून थेट हॉस्पिटलमध्ये नेली होती. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये (employee) भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेसंदर्भात संशयित ताजणे यांच्या पत्नी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सीमा ताजणे (bjp corporator) यांनी ‘सकाळ’शी बोलताना अनेक प्रश्न उपस्थित केले.
तोडफोड करण्याची वेळ का आली?
बिटको रुग्णालय तोडफोडीचे समर्थन मी करणार नाही; मात्र राजेंद्र ताजणे यांना तोडफोड आंदोलन करण्याची वेळ का आली? हे सुरवातीला प्रशासनाने जाणून घ्यायला हवे. बिटको हॉस्पिटलमध्ये अनेक दिवसांपासून लोक मृत्यू होत आहेत. याची कारणे वेगळी असली तरी लोकांना आरोग्य सोयीसुविधा मिळत नसून येथील स्टाफ लोकांशी व्यवस्थित वागत नाही. या कोविड सेंटरचे प्रमुख डॉक्टर जितेंद्र धनेश्वर हे खरोखर लोकसेवी डॉक्टर आहेत, मात्र रुग्णालयात असणाऱ्या असुविधा या सर्व मृत्यूला कारणीभूत आहेत. तोडफोड करण्याची वेळ का आली, याची कारणे प्रशासनाने जाणून घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग वीसच्या नगरसेविका सीमा ताजणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
याचे परिक्षण प्रशासनाने केले पाहिजे
त्या म्हणाल्या, की रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाही. रुग्णांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. येथे कामास असलेला स्टाफ लोकांची नीट वागत नाही. अरेरावीची उत्तरे देतात. शिवाय मृतदेह पॅक करण्यासाठी नातेवाईक स्वतः काम करतात. रुग्णांची निगा कनिष्ठ कर्मचारी नीट ठेवत नाही. शिवाय अनेक कर्मचारी सकाळी सह्या करून निघून जातात. सामान्य जनता भीतीने शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे आंदोलनाची भाषा चुकीची असली तरी तोडफोड आंदोलन का करावे लागले, याचे परिक्षण प्रशासनाने केले पाहिजे, असे डॉ. ताजणे यांनी सांगितले.
तोडफोडीनंतर शंभर रेमडेसिव्हिर दाखल
राजेंद्र ताजणे यांनी तोडफोड केल्यानंतर बिटको रुग्णालयात रात्री शंभर रेमडेसिव्हिर इंजेक्शन दाखल झाले. गेल्या बारा दिवसांपासून रुग्णांना इंजेक्शन मिळत नव्हते. त्यामुळे अनेक रुग्णांचे हाल होत होते. शिवाय काही रुग्ण दगावले. तोडफोडीनंतर प्रशासनाने तत्काळ हॉस्पिटलमध्ये इंजेक्शनचा पुरवठा केल्याचे सांगण्यात आले.
Associated Media Ids : NS1221B03502
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.