नाशिककर सुधरेनात! विक्रमी दंडवसुलीनंतरही रस्त्यांवर गर्दी

Fine
Finee sakal
Updated on

नाशिक : प्रवासी वाहतूक नियमांकडे काणाडोळा करणाऱ्या वाहनचालकांवर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, दिवसभरात ५५हून अधिक वाहनचालकांकडून सुमारे ३५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. सर्वाधिक कारवाई मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीत झाली. विक्रमी दंडवसुलीनंतरही गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाहीय. (record fines were collected from citizens who broke traffic rules in Nashik city)


गुरुवारी (ता. १) दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या १६७ जणांकडून ८३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सामाजिक अंतर नियम प्रकरणी दहा जणांकडून पाच हजार रुपये, चार आस्थापनांना २० हजार, संचारबंदी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २९ जणांकडून १६ हजार रुपये दंड पोलिसांनी वसूल केला. कोरोना नियमांमध्ये वाहनांचा वापर करण्याबाबतसुद्धा आदेश देण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांनी ५५ वाहनचालकांविरोधात कारवाई करीत ३५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.

दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांसह इतर खासगी वाहनांना प्रवाशी वाहतुकीबाबत नियम घालून देण्यात आले आहे. मात्र, वाहनचालक सर्रास हे नियम मोडतात. त्यामुळे यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार असून, वाहनचालकांसहित नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


(record fines were collected from citizens who broke traffic rules in Nashik city)

Fine
आदिवासी भागात कोरोनावरील उपचारासाठी ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.