लासलगाव (जि. नाशिक) : दि लासलगांव मर्चन्टस को-ऑफ बँकेस सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात २ कोटी ३९ लाखांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अशोक गवळी, उपाध्यक्ष राजेंद्र घोलप व ज्येष्ठ संचालक अजय ब्रम्हेचा यांनी दिली. बँकेने स्थैर्य वृध्दीच्या दृष्टीने भरघोस तरतुदी केलेल्या असून निव्वळ नफा एक कोटी ६२ लाख इतका झालेला आहे.
या वर्ष अखेरीस बँकेचे स्वनिधी १२ कोटी ४४ लाख असून ठेवी १४७ कोटी ६२ लाख आहेत. कर्जवाटप ५७ कोटी २७ लाख केलेले असून सुरक्षित गुंतवणूक ७९ कोटी १७ लाख केलेली आहे. बँकेचे नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असून विशेषत: ग्रामीण भागात कार्यरत असल्याने ग्राहक शेती क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यामुळे नैसगिक आपत्ती व कोरोनाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर बँकेस कर्जवसुलीस अतिशय प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागला. तथापि सौजन्य व सहकार्याच्या वसुलीच्या माध्यमातून समाधानकारक वसुली करून एनपीओ ६.२६% इतके राखण्यात यश आलेले आहे. कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीतून हे सहज साध्य झाले असे बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले. बँकेच्या संचालक मंडळाने सामाजिक बांधीलकीतून शहराच्या विकासासाठी काही भरीव कार्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
''लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या ७५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच विक्रमी नफा सभासद व कर्मचारी यांच्या माध्यमातून मिळविला आहे. बँकेचे कामकाज बघता लवकरच लासलगावच्या मुख्य रस्त्यावर नवीन वास्तू उभारण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.'' - अजय ब्रम्हेचा, माजी अध्यक्ष, लामको.
''लासलगाव मर्चंट बँकेची नियमित सभासद हित जोपासण्याची प्रवृत्ती असून सभासदांच्या विश्वासामुळे बँकेचे कामकाज नियमानुसार चालू आहे. सभासद हित लक्षात घेऊन लवकरच समाजोपयोगी उपक्रम बँकेच्या माध्यमातून राबवले जातील.'' - संतोष पलोड, माजी अध्यक्ष, लामको
बँकेचे संचालक अजय ब्रम्हेचा, संतोष पलोड, संजय कासट, डी. के. जगताप, सचिन शिंदे, सचिन मालपाणी, ओमप्रकाश राका, हर्षद पानगव्हाणे, पारसमल ब्रम्हेचा, प्रवीण कदम, सोमनाथ शिरसाठ, किसनराव दराडे, सौ. संगिताताई पाटील, सौ. अर्चना पानगव्हाणे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जाधव आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.