नाशिकच्या बिटको रुग्णालयात विक्रमी RT-PCR चाचण्या

Corona test
Corona testesakal
Updated on

नाशिक रोड : राज्यात व नाशिक शहरात कोरोना दुसरी लाटेत (Corona second wave) अनेकांचे बळी घेत असताना नाशिक रोडच्या नवीन बिटको रुग्णालयात एप्रिल महिन्यात युद्धपातळीवर कोट्यवधी रुपयांची मॉलिक्युलर लॅब (Molecular Lab) सुरू झाली. या लॅबने गेल्या चार महिन्यात आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट करण्याचा नवा विक्रम तर केलाच परंतु, हजारो नागरिकांना जीवदान दिले. त्यांचे लाखो रुपये वाचवले आहेत. सरकारचा निधीही सार्थकी लागला आहे.

पुण्या-मुंबईच्या लॅबलाही टाकले मागे

कोरोनाची दुसरी लाट आली, तेव्हा नाशिकमध्ये आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्टिंग लॅब नव्हती. बिटको रुग्णालयात नाशिकच नव्हे तर राज्यभरातून रुग्ण मोठ्या आशेने दाखल होत होते. मात्र, त्यांचे सॅम्पल पुणे, औरंगाबाद, मुंबईला पाठवावे लागायचे. मोलाचा वेळ वाया गेल्याने रुग्णांवर उपचार करणे, रुग्ण ट्रेसिंग आदींना विलंब होऊन कोरोनाचा प्रसार वेगाने होत होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात पहिली लॅब सुरू झाली. नंतर खासगी रुग्णालयामध्ये टेस्टिंग सुरू झाले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यांच्यावर मर्यादा येत असल्याने महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी जर्मन बनावटीची अत्याधुनिक लॅब बिटकोत सुरू केली. या लॅबने टेस्टबाबत पुणे, मुंबई, औरंगाबादच्या लॅबनाही मागे टाकले आहे. या लॅबमध्ये गेल्या चार महिन्यात पन्नास हजार आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट झाल्या आहेत. याचे श्रेय जाते ते लॅबचे प्रमुख डॉ. गणेश गरुड, डॉ. स्वाती भावसार, डॉ. राजश्री गवारे आणि त्यांच्या तीस सहकाऱ्यांना. कोरोना विषाणूचे रोजच परीक्षण करताना पाच कर्मचाऱ्यांना कोरोना झाला तरी न डगमगता या योद्ध्यांनी हे जोखमीचे काम सुरूच ठेवल्याने पन्नास हजाराची विक्रमी टेस्ट पार पडू शकले.

नाशिकच्या बिटको रुग्णालयातील लॅबमध्ये गेल्या चार महिन्यात 50 हजार RT-PCR टेस्ट पुर्ण झाल्या आहेत.
नाशिकच्या बिटको रुग्णालयातील लॅबमध्ये गेल्या चार महिन्यात 50 हजार RT-PCR टेस्ट पुर्ण झाल्या आहेत.esakal
Corona test
जनआशीर्वाद यात्रेत आरोग्यमंत्र्यांकडून कोरोना नियमांची ऐशी-तैसी

चार तासात अहवाल देणारी वैशिष्ट्यपूर्ण लॅब

लॅबची क्षमता दिवसाला दोन हजार सॅम्पल टेस्टिंगची आहे. कोरोना भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नसताना या लॅबमधील डॉक्टर, टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर रोजच जीव धोक्यात घालून, घरच्यांचा या नोकरीला विरोध असताना कोरोनाशी सामना करत होते. कमी मनुष्यबळातही त्यांनी दुसऱ्या लाटेत दिवसाला दीड हजारापर्यंत टेस्ट केल्या. सध्या दीडशे टेस्ट रोज होत आहेत. महापालिका हद्दीतील ३३ सेंटरचे सॅम्पल येथे येतात. चार तासात अहवाल देणारी ही वैशिष्ट्यपूर्ण लॅब आहे. याबाबत पुणे, मुंबई, औरंगाबादच्या लॅबवर मात केली आहे. तिसरी लाट (Third wave) आली तरी तिला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी ही लॅब आणि तिचे कोरोना योद्धे सज्ज आहेत.

Corona test
फटाक्यांचे उत्पादन जोमात; उत्पादकांना मात्र तिसऱ्या लाटेची धास्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()