Diwali Festival : दिवाळीत बाजारपेठेत विक्रमी उलाढाल; कोरोनानंतर बाजारात चैतन्य

diwali market after corona
diwali market after coronaesakal
Updated on

नाशिक : कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर प्रथमच मुक्त वातावरणात सण व उत्सव साजरा करणाऱ्या नाशिककरांनी बाजारातील चैतन्यही अनुभवले. आतापर्यंत सर्व विक्रम मोडीत काढत बाजारपेठेत ५०० कोटींच्या वर आर्थिक उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले. (Record turnover in market during Diwali Festival nashik news)

दिवाळी कालावधीत सर्वसाधारणपणे नाशिक शहरात दीडशे ते दोनशे कोटी रुपयांची उलाढाल होते. यंदा मात्र याच्या अडीचपट उलाढाल बाजारपेठेत झाली. यंदाच्या दिवाळीत झालेली उलाढाल आतापर्यंतची विक्रमी मानली जात आहे. जवळपास ५०० कोटींच्या वर मागील १५ दिवसांत उलाढाल झाल्याने भविष्यातील हाच ट्रेंड कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. २०२० व २१ या दोन आर्थिक वर्षांमध्ये कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाले होते. त्या काळात सर्वच व्यवसायांवर निर्बंध आले.

नागरिकांमध्ये सण, उत्सव साजरा करण्याचा उत्साह नव्हता. यंदा मात्र शासनाकडून कुठल्याच प्रकारचे निर्बंध नसल्याने नागरिकांनीही उत्साहात सण साजरे केले. किंबहुना कणभर का होईना हात आखडता न घेता अधिक खर्च केला. रिअल इस्टेट व त्या अनुषंगाने जवळपास १२० व्यवसायांना यानिमित्त उभारी मिळाली. इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशनमध्येही मुक्तहस्ते खर्च केला. ग्राहकांकडून विशेष करून मोबाईल व अँड्रॉइड टीव्हीला अधिक मागणी वाढली.

शाश्वत व फायदेशीर उत्पन्न

नाशिकमध्ये जवळपास सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल सोने खरेदीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. फिक्स डिपॉझिट व अन्य गुंतवणुकीवरील व्याज मोठ्या प्रमाणात कमी झाले. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शेअर मार्केटमध्ये मराठी माणसांचा टक्का कमी असल्याने तसाही त्या क्षेत्राकडे ओढा कमी आहे. जागांचे भाव कमालीचे लग्नाला भिडल्याने भांडवलदारांशिवाय त्या व्यवसायाला पर्याय नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी हाच एकमेव पर्याय वाटल्याने त्यातून खरेदीकडे कल वाढल्याचे बाजारपेठेत दिसून आले.

diwali market after corona
Aditya Thackeray | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : आदित्य ठाकरे

पर्यटनाला बहर

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत पर्यटन पूर्णपणे ठप्प पडले. २०२० मध्ये नाशिककरांनी पर्यटनावर फुली मारली. मात्र, मागील दोन वर्षांची कसर यंदा भरून काढल्याचे दिसून आले. यंदा पर्यटनाचा बहर इतका फुलला, की प्रत्येक कुटुंबात छोटी असली तरी एक ट्रीप होत आहे. परिणामी, मागील दोन वर्षांतील तोटा यंदा भरून काढला जात आहे. गेल्या १५ दिवसांपासून पर्यटनाची ठिकाणे निश्चित करण्यापासून ते पर्यटन करण्यापर्यंत जवळपास ७० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून देण्यात आली.

पाहणीनुसार झालेली अंदाजे उलाढाल कोटी रुपयांत

- रिअल इस्टेट : १५०

- इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन : ५०

- सोने : १२५

- फॅशन/फॅब्रिक्स : ७५

- मिठाई व गिफ्ट आर्टिकल्स : ५०

- फटाके : १०

- वाहने : ५५

- पर्यटन : ७०

- इतर : ७५

"मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाची बाजारपेठ चांगली आहे. मिठाईला अधिक मागणी होती. मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री झाल्याने समाधान आहे."

- अशोक कासलीवाल, मिठाई विक्रेते

"या वर्षी मावा-ड्रायफ्रूट मिठाई उत्कृष्ट व आकर्षक होत्या. तसेच दर्जेदार फराळही विक्रीसाठी होते. मागणीनुसार उपलब्ध होती. उच्च प्रतीची मिठाई असल्याने व्यवसायही उत्तम झाला."

- पुखराज चौधरी, संचालक, राज स्वीट

"पेठ रोड भागातील बरीचसे नागरिक शिराई, झाडू, टोपली, सूप आदी वस्तू बनवितात. संपूर्ण शहरात ते पुरवठा केला. यास नेहमीपेक्षा जास्त प्रतिसाद लाभला."

- नंदा थोरात, सामाजिक कार्यकर्ता

diwali market after corona
Nashik : रद्दीवाले कुतुबुद्दीन यांनी दिवाळीत वाटली 10 टन साखर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.