Nashik : ''ते आमच्या डोळ्यांदेखत होरपळत होते मात्र आम्ही हतबल होतो'', प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

Dilip Gaydhani
Dilip Gaydhaniesakal
Updated on

नाशिक : येथील नाशिक- पुणे महामार्गावर शिंदे-पळसे येथे टोलनाक्याजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ही बस तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. नेमका हा अपघात कसा झाला अन् बसमधील प्रवाशांचे प्राण या अपघातातून प्रत्यक्षदर्शींनी कसे वाचविले ते जाणून घेऊया. (recounts thrilling experience of eyewitnesses Nashik palase Bus Fire Accident Nashik news)

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

Dilip Gaydhani
Nashik : ब्रेक फेल झालेल्या ST बसने दुचाकीस्वारांना चिरडलं, 2 ठार

नाशिक- पुणे महामार्गावर शिंदे-पळसे टोलनाक्याजवळ बसला ज्या ठिकाणी भीषण अपघात झाला त्याठिकाणी व्यवसाय करणारे प्रत्यक्षदर्शी दिलीप गायधनी सांगतात, आम्ही दुकानात बसलो होतो. अचानक जोरदार आवाज ऐकू आल्याने दुकानाबाहेर येऊन पाहतो तर एक बस दुसऱ्या बसला धडकली होती. आम्ही कुठलाही विचार न करता अपघात स्थळाकडे धाव घेतली. प्रथमतः बसमधून धुर येत होता. त्यामुळे ही बस पेट घेणार हे लक्षात आले होते म्हणून आम्ही बसमधील प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. बसची पुढची बाजू धडकल्याने मुख्य दरवाजा लॉक झाला होता.

त्यामुळे मागील बाजूला असलेल्या अपात्कालीन मार्गाने प्रवाशांना बाहेर काढले. यासह मुख्य दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केला अन् त्यातूनही प्रवाशांना बाहेर काढले. सर्व प्रवासी बसमधून बाहेर येताच क्षणात बसने पेट घेतला. दोन दुचाकीस्वार बसखाली दबले गेले होते अन् बसने पेट घेतला. क्षणात बसला आगीने वेढा घातल्याने बसखाली दबलेल्या दुचाकीस्वारांना डोळ्यादेखत होरपळताना बघत होतो. मात्र आम्ही हतबल झालो होतो. त्यादुचाकीस्वारांचे प्राण वाचवू शकलो नाही यांची मात्र मनात खंत आहे अशी भावनिक प्रतिक्रीया प्रत्यक्षदर्शी दिलीप गायधनी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Dilip Gaydhani
Nashik Bus Accident: ''दैव बलवत्तर म्हणून दार उघडले नाहीतर...'' प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()