Talathi Recruitment : राज्यात 4 हजार तलाठी पदांची भरती; 3 हजार पदे नव्याने मंजूर

Talathi Bharti Recruitment
Talathi Bharti Recruitment esakal
Updated on

मालेगाव शहर (जि. नाशिक) : राज्यातील अनेक जिल्ह्यांत तलाठी पदे रिक्त असून, अनेक गावांचा अतिरिक्त प्रभार असल्याने जनतेच्या कामांना अडचणी येतात. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपवविण्यात आली आहेत. रिक्त पदांसह नव्याने पुनर्रचित सजा वाढ झाल्याने राज्यात चार हजार १२२ पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. (Recruitment of 4 thousand Talathi posts in state 3 thousand posts newly sanctioned Nashik news)

राज्यात १२ हजार ६२६ तलाठी पदे मंजूर असून, त्यातील आठ हजार ५७४ पदे स्थायी असून, चार हजार ६२ पदे अस्थायी स्वरूपाची आहेत. ग्रामपातळीवर प्रत्येक व्यक्तीचा तलाठ्याशी संबंध येत असतो. सात-बारा, उत्पन्न, शेतीविषयक दाखले यासाठी नियमितपणे तलाठ्यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्यांकडे तीन ते चार गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते.

दोन वर्षांपूर्वीची एक हजार १२ पदे रिक्त असून, गाव परिसरातील मोठ्या गावांमुळे वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन पुनर्रचित सजानिर्मिती करण्यात आली. यामुळे नव्याने तीन हजार ११० पदे भरली जाणार असल्याने तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून, यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.

शिधापत्रिकांची कामे, नैसर्गिक आपत्तीवेळी मदत व सहाय्यता करणे, कायदा सुव्यवस्थेच्या वेळी कामे करणे, कृषिगणना करणे अशी वेगवेगळी कामे करावी लागतात. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास ‘सजा’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे एक ते तीन गावांच्या समूहास एक तलाठी असतो. राज्यातील सर्व गावांची दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते.

तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने विभागनिहाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेत शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी महसूल उपायुक्तांना देण्यात आली असून, ‘समन्वय अधिकारी’ म्हणून त्यांची नियुक्ती दिली आहे.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Talathi Bharti Recruitment
Nashik News: पूर्व विभागात 3 वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद

पंधरा दिवसांत माहिती पाठविण्याचे आवाहन

तलाठी भरतीसाठी सामाजिक प्रवर्गनिहाय किती पदे असतील, याचा आराखडा, विविध संवर्गासह सर्वसाधारण पदे, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, पदवीधर अंशकालीन, अनाथ याप्रमाणे पदांचे आरक्षण, टक्केवारीचा प्रमाण तक्ता पंधरा दिवसांत अद्ययावत पाठवावा, असे २९ नोव्हेंबरच्या शासन निर्णयात नमूद केले आहे. नाशिक विभागात एक हजार ३५, औरंगाबाद- ८४७, कोकण- ७३१, नागपूर- ५८०, अमरावती- १८३, तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण चार हजार १२२ पदांचा या महाभरतीत समावेश आहे.

जिल्हानिहाय तलाठी भरती पदे

जिल्हा आधीची मंजूर पदे नव्याने मंजूर एकूण

नाशिक ७७ १७५ २५२

धुळे ६७ १६६ २३३

नंदुरबार ४० -- ४०

जळगाव ५२ १४६ १९८

नगर ११० २०२ ३१२

औरंगाबाद ४० ११७ १५७

जालना १५ ८० ९५

परभणी ०८ ७६ ८४

हिंगोली ०७ ६१ ६८

नांदेड ३५ ८४ ११९

लातूर ११ ३९ ५०

बीड २६ १३८ १६४

उस्मानाबाद २०. ९० ११०

मुंबई शहर -- १९ १९

मुंबई उपनगर ०८ ३१ ३९

ठाणे ११ ७२ ८३

पालघर ७१ ८६ १५७

रायगड ३२ १४० १७२

रत्नागिरी ३९ १०३ १४२

सिंधुदुर्ग २० ९९ १०९

नागपूर ३१ ९४ १२५

वर्धा १३ ५० ६३

भंडारा ०९ ३८ ४७

गोंदिया ११ ४९ ६०

चंद्रपूर १८ १३३ १५१

गडचिरोली २० ११४ १३४

अमरावती १२ ३४ ४६

अकोला ११ ०८ १९

यवतमाळ २३ ५४ ७७

वाशीम १० -- १०

बुलडाणा २१ १० ३१

पुणे ०८ ३३१ ३३९

सातारा -- ७७ ७७

सांगली ३८ ५२ ९०

सोलापूर ‌‌ ६३ १११ १७४

कोल्हापूर ३५ ३१ ६६

---------------------------------

एकूण- १०१२ ३११० ४१२२

"अनेक वर्षांपासून तलाठी पदे रिक्त आहेत. सदरची पदे दोन टप्प्यांत भरण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. पदे भरण्यासंबंधी सातत्याने पाठपुरावा केला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एकाचवेळी नव्याने मंजूर पदांसह भरती करण्यास अनुमती दिली. या भरतीने जनतेच्या प्रश्‍नांना गावपातळीवर कामाला प्राधान्य देणे सोयीस्कर होईल."

- अनिल सूर्यवंशी, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना

"प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. परिणामी, अतिरिक्त गावे व सजा असल्याने शेतकरी व नागरिकांच्या कामासाठी कसरत होती. या वाढीव पदांसह भरतीच्या निर्णयामुळे जनतेस तलाठ्यांनाही दिलासा मिळणार आहे."

- प्रकाश पवार, तालुकाध्यक्ष, तलाठी संघटना, मालेगाव

Talathi Bharti Recruitment
Winter Season : थंडीच्या कडाक्याने शेकोट्या पेटल्या; जिमखाने, मैदानावर तरुणांची गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.