Recruitment News: जलसंधारण अधिकाऱ्यांची भरती लांबली! 8 महिन्यांपासून समितीच्या निर्णयाची प्रतीक्षा

Recruitment
Recruitmentesakal
Updated on

Recruitment News : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून त्यांना आवश्यक नागरी सुविधा पुरवण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने जलसंधारण अधिकाऱ्यांची (गट-ब) ६७० पदे भरण्याचा निर्णय घेतला.

भरतीची पध्दत ठरवण्यासाठी राज्य शासनाने डिसेंबर २०२२ मध्ये समिती स्थापन केली. परंतु, अद्याप भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. (recruitment of water conservation officers delayed Waiting for committees decision since 8 months nashik)

मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्तालय छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थापन झाले. त्यानंतर क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्यात आली. रचना करताना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि त्यांना आवश्यक सुविधा पुरवणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला.

त्यासाठी जलसंधारण अधिकाऱ्याची (अराजपत्रित) नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ही पदे सरळसेवेने भरताना कुठली पध्दत अवलंबावी यासाठी जिल्हास्तरीय निवड समिती, प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समिती स्थापन केली.

मृद व जलसंधारण आयुक्त मधुकर अर्दड हे या समितीचे अध्यक्ष आणि सात सदस्यांचा या समितीत समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे ऑनलाइन स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी ‘टीसीएस’ किंवा ‘आयबीपीएस’ यांच्यापैकी एका कंपनीची निवड करण्याचे स्पष्ट आदेश ता.१९ डिसेंबर २०२२ रोजी राज्य शासनाने दिले आहेत.

या संपूर्ण प्रक्रियेला आठ महिने झाले तरी अजून जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. तेव्हा संपूर्ण भरती प्रक्रिया कधी पूर्ण होणार असा प्रश्न इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला आहे. राज्य शासनाने त्वरित ही जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Recruitment
Sakal Exclusive : महसुली गावांच्या विकासासाठी अवघे 87 कोटी; NMRDA बँक खात्याची स्थिती

दोन्ही वेगवेगळे विभाग

जलसंपदा विभागाच्या भरती प्रक्रियेत काहीतरी अडचण निर्माण झाली आहे. जलसंपदा विभाग व जलसंधारण विभाग हे पूर्वी एकच होते.

मात्र, आता जलसंधारण विभाग स्वतंत्र झाला असून त्यांची भरती प्रक्रिया सुरळीतपणे सुरु असून, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती निवड समितीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

संवर्गनिहाय रिक्त जागा

एससी-८५

एसटी-५६

एनटी-६४

विशेष मागास-१६

ओबीसी-१२९

इडब्ल्युएस-६७

खुला-२५३

एकूण-६७०

Recruitment
Nashik 11th Admission : अकरावीच्‍या चौथ्या विशेष फेरीत सहभागाची उद्यापर्यंत मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.