Onion Rates Fall : लाल कांदा बाजारभाव सरासरी हजाराच्या खाली! भाव घटत असल्याने शेतकऱ्यांत संताप

Red onion prices News
Red onion prices Newsesakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : बाजार समितीच्या मुख्य व अंदरसूल उपबाजार आवारावर गत सप्ताहात लाल कांदा आवकेत वाढ झाली तर बाजारभावात घसरण झाली. बाजारभाव सरासरी हजारांच्या खाली आल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. (Red onion market price below average thousand Anger among farmers due to falling prices nashik news)

सप्ताहात येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर एकुण कांदा आवक १ लाख ७८१० क्विंटल झाली. लाल कांद्याचे बाजारभाव किमान २०० रुपये, कमाल १३०० रुपये तर सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.

अंदरसुल उपबाजार आवारावर कांद्याची एकुण आवक ६८ हजार २५० क्विंटल झाली असुन लाल कांद्याचे बाजारभाव किमान २०० रुपये, कमाल ११७६ रुपये तर सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.

सप्ताहात गव्हाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव तेजीत असल्याचे दिसून आले सप्ताहात गव्हाची एकुण आवक १३० क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान २२०० रुपये, कमाल ३०२६ रुपये तर सरासरी २५७० रुपये पर्यंत होते.

सप्ताहात बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात बाजरीची एकुण आवक १४ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान २ हजार रुपये, कमाल २८०० रुपये तर सरासरी २०९१ रुपये पर्यंत होते.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Red onion prices News
Yuva Sahitya Mahotsav: युवा साहित्य महोत्सवात प्रमोद घोरपडेंची मोहोर; आमदार तांबेंच्या हस्ते पारितोषिक वितरण

सप्ताहात हरभ-याच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. हरब-यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसााारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात हरभ-याची एकुण आवक १७२ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३५०० रुपये , कमाल ६०९० रुपये तर सरासरी ४७०१ रुपये पर्यंत होते.

तुरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात तुरीची एकुण आवक ३७ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ५ हजार रुपये, कमाल ६५९० रुपये तर सरासरी ६४०० रुपये पर्यंत होते.

सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात घसरण झाली सोयाबीनची एकुण आवक ११४ क्विंटक झाली असुन बाजारभाव किमान ४३०० रुपये . कमाल ५१९० रुपये तर सरासरी ५१०० रुपये पर्यंत होते.

सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात मक्याची एकुण आवक ८ हजार १३६ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान २०४१ रुपये, कमाल २१५२ रुपये तर सरासरी २१२० रुपये प्रति क्विंटल असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.

Red onion prices News
Marathi Food Festival : मराठी खाद्यपदार्थ महोत्सवाला इंदिरानगरवासीयांची गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.