Nashik News: अवकाळीमुळे लाल कांद्याचे बियाणे उत्पादन घटणार; जादादराने खरेदी करण्याची उत्पादकांवर वेळ

Red Onion News
Red Onion Newsesakal
Updated on

Nashik News : राज्यासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा पिकाबरोबरच डोंगळ्यांचे प्लॉट उद्धवस्त झाले आहे. अवकाळीमुळे कांदा बियाणे तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम मोठा परिणाम झाला आहे.

गारपिटीमुळे ऐनभरात आलेल्या डोंगळ्यांचे नुकसान झाल्याने अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर बियाणे तयार झाले नसल्याची धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे यंदा कांद्याच्या तीनही हंगामासाठी कांदा बियाण्याची टंचाई निर्माण होणार आहे.

याचा परिणाम बियाणांच्या दर वाढीबरोबरच लाला कांद्याच्या लागवडीवर ही होण्याची शक्यता आहे. (Red onion seed production will decrease due to bad weather Time on producers to buy at high prices Nashik News)

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे सर्वा‌धिक उत्पादन घेतले जाते. लाल (पावसाळी), रांगडा (खरीप, रब्बी), उन्हाळी (रब्बी) या तीन हंगामात कांद्याची लागवड केली जाते. शाश्वत आणि टिकावू कांद्याचे उत्पादन मिळावे म्हणून सुमारे ८० टक्के कांदा उत्पादक शेतकरी स्वतः बियाणे तयार करतो.

या तिन्ही हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात डोंगळ्याची लागवड करतात. मात्र, यंदा गारपीट आणि अवकाळीच्या संकटामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील डोंगळ्याचे अर्थात कांद्याचे बियाण्याचे प्लॉट उद्ध्वस्त झाले आहे.

त्यामुळे यंदा कांदा बियाण्याची टंचाई निर्माण होऊन महागडे बियाणे खरेदी करण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर येणार आहे. त्यामुळे बियाणे टंचाईमुळे लागवडीवर परिणाम होऊन भविष्यात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

काही शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये डोंगळे लावण्याचा वेगळा प्रयोग करून पाहिला. मात्र शेडनेटमध्ये डोंगळ्याच्या फुलांवर परागीकरण झाले नाही. त्यातून बियाणे उत्पादन झाले नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Red Onion News
Nashik News : परसबागांमधून शाळा मिळवतात ताजा भाजीपाला! जिल्ह्यातील अनेक शाळांचा सहभाग

यामुळे शेतकऱ्यांना आता बियाणे उत्पादन करताना अवकाळी पासून आपले डोंगळ्याचे पीक वाचवण्याचा देखील पर्याय उपलब्ध नाही. जिल्ह्यातील चांदवड, देवळा, सटाणा व निफाड तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसामुळे बियाणे उत्पादन होणार नसल्याचे वास्तव आहे.

आर्थिक नियोजन कोलमडणार

शाश्वत आणि दर्जेदार कांदा उत्पादनासाठी शेतकरी स्वतः कांदा बियाणे तयार करतो. यंदा मात्र अवकाळीमुळे बियाणे उत्पादित होऊ शकले नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्याला दरवर्षापेक्षा चारपटीने महागडे बियाणे खरेदी करावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांचे शेतीचे आर्थिक नियोजन बिघडणार हे निश्‍चित आहे.

Red Onion News
Water Crisis : ऐन उन्हाळ्यात लांबले गिरणाचे आवर्तन! पाणीटंचाईची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.