चांदोरी (जि. नाशिक) : नायलॉन मांजाच्या खेळात रंगलेले रक्तरंजित आकाश असा ‘रेड स्काय’ ॲनिमेटेड संदेशपट तब्बल ७०० चित्र काढून घरच्या घरीच कसबे सुकेणे येथील हौशी चित्रकार आणि लघुपटनिर्माते प्रशांत रामराव पाटील यांनी बनविला आहे. (Red Sky An animated message board made at home by taking 700 pictures on nylon manja nashik news)
निळेशार आकाशात मुक्त संचार करणारा एक पक्षी. माळरानावरून प्रवास करत तो उडत उडत शहरात येतो. शहरातील अपार्टमेंट, देवळे पार करत तो पुढे जात राहतो. संक्रांतीच्या दिवशी शहरात पतंगबाजीला ऊत आलेला. निरनिराळ्या आकाराच्या पतंगांनी आकाश झाकोळून गेलेले.
पतंगाच्या दोऱ्यांच्या सापळ्यातून स्वतःला कसाबसा वाचवत तो बाहेर पडतो खरा पण पुन्हा एका नायलॉन मांजाच्या फासात त्याची मान अडकते आणि सुरू होते त्या फासातून मुक्त होण्याची प्राणांतिक धडपड.
त्या धडपडीत फास आणखी आवळला जातो, पक्षी रक्तबंबाळ होतो.
त्याची पिसे तुटतात आणि त्याच्या रक्ताचा ओघळ नायलॉन मांजाच्या दोरीवरून वाहत खाली येतो. नायलॉन मांजाच्या प्राणघातक जखमांमुळे पक्षी गतप्राण होतो आणि त्या पतंगाला घेऊन खाली जमिनीवर निष्प्राण पडतो. असा याचे दोन मिनिटाचे कथानक आहे.
ॲनिमेशन करण्याचे कुठलेही शिक्षण श्री. पाटील यांनी घेतलेले नाही.
अगोदर त्यांनी सुसंगत कथा लिहिली. स्वनुभवातून शिकत प्रत्येक फ्रेम संगतवार लावत त्यांनी लघुपट पूर्ण केला. दोन मिनिटांच्या लघुपटासाठी त्यांना ७०० चित्र काढावी लागली.
लघुपटाच्या शेवटी त्यांनी विविध वृत्तपत्रातील मांजामुळे जखमी आणि मृत झालेल्या पक्ष्यांची छायाचित्रे आणि मृत पक्ष्यांची आकडेवारी टाकली आहे. त्यामुळे हा विषय अधिकच वास्तवदर्शी झाला आहे.
"अजूनही चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून वाचतो. दरवर्षी नायलॉन मांजामुळे हजारो पक्षांचा जीव अकारण जातो.
समाजमन त्याची दखल पुरेशा गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे स्वतःमधील कौशल्य वापरत ॲनिमेशनपटाद्वारे मी छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न केला असे प्रशांत पाटील यांनी सांगितले."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.