Nashik News : ‘अपून का भाई आयेगा, भाई का एकच फटका, तो पडेगा खटका...’, ‘एकाच फटक्यात खेळ खल्लास...’ अशा आशयाचे डायलॉगबाजी करीत रिल्स बनविण्यामध्ये तरुणाई भलतीच आघाडीवर आहे.
गुंडगिरीची भाषा करीत रिल्स बनवून ‘भाईगिरी’ करण्याचा फंडाही काहीजण आजमावत आहेत. सिडकोतील संदीप आठवले याच्या खुनाच्या घटनेतून रिल्समधली भाईगिरीची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
परंतु नाशिक सायबर पोलिसांनी आता अशा रिल्सकडे आपला मोर्चा वळविला असून, लवकर रिल्सच्या माध्यमातून भाईगिरी करणाऱ्यांच्या ‘नांग्या’ ठेचल्या जाणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. (Reels of Criminal Signals special attention and strict action by cyber cells Nashik News)
सध्या रिल्सचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांना रिल्स बनवून ते अपलोड करण्याची जणू भुरळच पडली आहे. यात युवती, महिलाही मागे नाहीत. पाककृतीपासून ते विनोदी लटके- झटक्यापर्यंतचे रिल्स सोशल मीडियावर पहावयास मिळतात.
परंतु अलीकडे रिल्सच्या माध्यमातून ‘भाईगिरी’चा अनोखा ट्रेंडही आला आहे. भाईगिरीच्या उडाणटप्पूच्या भाषेतील डायलॉगबाजी करीत त्याचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात तरुणाई आघाडीवर आहेत.
महाविद्यालयीन मुले अगदी शाळेच्या गणवेशात अशी भाईगिरीची डायलॉगबाजीची रिल्स बनवितात. अशा रिल्सला लाखो पाहणाऱ्याच्या कॉमेट अन् लाईक्सही मिळतात हे विशेष. परंतु, अलीकडेच गंगाघाटावरील एका तरुणाने ‘भाईगिरी’चा पेहराव करून त्याच भाषेतला रिल्स व्हायरल केली.
या रिल्सची भनक शहर पोलिसांनी लागली असता, त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो दुकानात काम करणारा, तर बाप रिक्षाचालक होता. परंतु डोक्यात भाईगिरीचे भूत शिरल्याने त्याने रिल्स बनवून अपलोड केला होता. मात्र, त्याला तो रिल्स बनविणे चांगलेच महागात पडले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रिल्समुळेच संदीपचा खून
संदीप आठवले खून प्रकरणामागेही रिल्स असल्याचेच समोर आले आहे. संदीप याने ओम्या खटकीला बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
त्याच सुडातून ओम्या खटकी याने संदीपचा खून केला आणि त्यानंतर त्यानेही रिल्स बनवून ‘एका फटक्यात खेळ खल्लास...’ असा डायलॉगबाजी करीत व्हायरल केला होता.
"सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत रिल्स बनविणाऱ्यांवर सायबर सेलचे लक्ष आहे. अशा रिल्स बनविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच, अशा रिल्सला कॉमेट करणाऱ्यांवरही पोलिसांचे बारकाईने लक्ष राहील. तेव्हा रिल्स बनविणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. गुंडगिरीच्या भाषेतील रिल्स करणाऱ्यांची गय केली जाणार नाही."
- डॉ. सीताराम कोल्हे, सहायक आयुक्त, गुन्हे शाखा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.