नाशिक : आगीच्या घटनेमुळे परिवहन विभाग ॲक्शन मोडवर

electric bike
electric bikeesakal
Updated on

म्हसरूळ (नाशिक) : इलेक्ट्रिक बाईकला आग लागून अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभारी Regional Transport Officer Pradeep Shinde यांनी इलेक्ट्रिक बाईकच्या अनधिकृत वापराबाबत पत्रक जारी केले आहे. प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा नागरीकांनी करावी व अशी वाहने खरेदी करण्यापूर्वी संबंधित वाहन वितरक व उत्पादक यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचा टाइप ॲप्रूव्हल टेस्ट रिपोर्ट व परिवहन आयुक्त कार्यालय यांनी जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खातरजमा करावी.

वाहन उत्पादक, वितरक व नागरीकांनी अशा वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नयेत व जर अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरित पूर्ववत करावेत, असे आवाहन केले आहे. दरम्यान, ई- बाईकमध्ये (Electric Bike) बेकायदेशीर बदल केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारादेखील शिंदे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) पर्यावरणपुरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२०- २१ लागू केले आहे. ई- बाईक्स व ई- वाहने यांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी १०० टक्के सूट दिलेली आहे. आजअखेर एकूण ६६ हजार ४८२ इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांची नोंदणी राज्यात झाली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम २ (५) मध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हेईकलची व्याख्या दिली असून, त्यानुसार २५० वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेगमर्यादा ताशी २५ पेक्षा कमी आहे. अशा इलेक्ट्रिक बाईक्सना नोंदणी पासून सूट आहे.

वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल

वाहन उत्पादक मान्यता प्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय इलेक्ट्रिक बाईक्सची विक्री करतात. तसेच, ज्या ई- बाईक्सना वाहन उत्पादनाची मान्यता मिळाली आहे. अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून अशा वाहनांची बॅटरी क्षमता २५० वॅटपेक्षा जास्त करतात अथवा वाहनांची वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा अधिकची करतात. वास्तविक अशा वाहनांना नोंदणी आवश्यक नसल्यामुळे त्यांना वाहनचालक अनुज्ञप्तीची आवश्यकता नाही. यामुळे अशाप्रकारे बेकायदेशीर बदल करून वाहन विक्री केल्यास रस्ता सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ई- बाईक्सना आग लागून अपघात असल्याच्या घटना वारंवार निदर्शनास आलेल्या आहेत.

electric bike
ई-वाहन खरेदी करताय, अधिकृत मान्यता बघितली का?

नाशिकमध्ये तपासणी मोहीम

प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा नागरीकांनी करावी व अशी वाहने खरेदी करण्यापूर्वी संबंधित वाहन वितरक व उत्पादक यांच्याकडे मान्यता प्राप्त संस्थेचा चाचणी अहवाल व परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खातरजमा करावी.

electric bike
OLA मोफत देणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या ऑफर

वाहन उत्पादक, वितरक व नागरीकांनी अशा वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नयेत व जर अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरित पुर्ववत करावेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा वाहनांची तसेच अशी वाहने उत्पादित करणारे उत्पादक व विक्री करणारे यांच्याविरुध्द विशेष तपासणी मोहीम राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये व नाशिकमध्ये राबविण्यात येणार आहे.

यामध्ये संबंधित वाहन उत्पादक, वाहन वितरक व वाहनधारक यांच्याविरुध्द मोटार वाहन कायदा १९८८, तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याच्या सूचना सर्व अधिकारी यांना दिलेल्या असून वाहन उत्पादक, विक्रेते व नागरीकांनी दखल घ्यावी, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.