राज्यात १५ हजार द्राक्षबागांची नोंदणी! एकट्या नाशिक जिल्ह्यात १२ हजार ९९३ प्लॉट

graps.jpg
graps.jpg
Updated on

लासलगाव (नाशिक) : द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी तसेच युरोपियन देशात होणाऱ्या निर्यातीकरिता रासायनिक अंशमुक्त द्राक्षाच्या निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीअंतर्गत नोंदणी करण्यात येते. २०२०- २१ च्या हंगामाकरिता निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या हंगामासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातून १४ हजार ७३३ प्लॉटची नोंदणी झाली आहे. यापैकी १२ हजार ९९३ प्लॉटची नोंदणी एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. 

नाशिक जिल्ह्यात १२ हजार ९९३ प्लॉट 

शेतकरी वर्गाने कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी तसेच नूतनीकरण करण्याचे आवाहन फलोत्पादन विभागाकडून करण्यात आले आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे अख्ख्या जगामध्ये भुरळ पाडणाऱ्या द्राक्ष निर्यातीला गेल्या वर्षी अवकाळीचा मोठा फटका बसल्याने द्राक्ष उत्पादनाचे गणित विस्कटले होते. द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. २०१९- २० हंगामात तब्बल एक लाख ९३ हजार टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून दोन हजार १७६ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. कृषिमाल निर्यात करताना प्रत्येक देशाच्या द्राक्षमण्यांचा आकार, द्राक्षघडाचे वजन, साखरेचे प्रमाण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कीटकनाशकांचे अंश आदींवर आधारित काही निकष आहेत. या निकषांचे पालन करीत भारतीय द्राक्षांनी युरोपीय देशात आपली ओळख निर्माण केली आहे. 

पाच वर्षांत झालेली द्राक्षबागांची नोंदणी 

२०१४-१५ २८,००० 
२०१५-१६ २९,००० 
२०१६-१७ ३२,००० 
२०१७-१८ ३८,००० 
२०१८-१९ ४३,१७२ 
२०१९-२० ३२,५९२ 
२०२०-२१ १४७३३ ( २५ नोव्हेंबर २०२०)  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.