Nashik Teacher Bharti : शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू

Teacher Recruitment
Teacher Recruitmentesakal
Updated on

Nashik Teacher Bharti : पवित्र पोर्टलद्वारे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची भरतीसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे या भरतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थाचालकांना पत्र काढत सूचना दिल्या असून, पवित्र पोर्टलवर नोंदणीचे काम सुरू झाले आहे. (Registration on pavitra portal for teacher recruitment has started nashik news)

राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारीत घेतली होती. या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच व्यवस्थापनाने त्यांच्याकडील शिक्षक प्रवर्गाची बिंदू नामावली सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.

२०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार विषयनिहाय रिक्त शिक्षक पदांची मागणी पोर्टलवर करण्यात यावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत परिपत्रकामध्ये सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याची जबाबदारी खासगी शैक्षणिक कक्ष व्यवस्थापनाची असेल. खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी संस्थांच्या जिल्ह्यामध्ये नोंदणी झाली आहे. त्या जिल्ह्याचे संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी पोर्टलवरील जाहिरातीला परवानगी द्यावी.

संबंधित विषयाचे शिक्षक अतिरिक्त असल्यास संबंधित व्यवस्थापनाने भरलेली विषयनिहाय रिक्त पदांची माहिती कारणासह संबंधित शिक्षणाधिकारी यांनी अमान्य करावी. खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांना पोर्टलवर पदभरतीकरिता जाहिरात देण्यासाठी मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह पदभरती, असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. खासगी व्यवस्थापन यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतील.

Teacher Recruitment
Dada Bhuse News: दादा येतात, बैठका घेतात..परिस्थिती मात्र ‘जैसे थे’; शिंदे सेनेच्या मार्केटिंगचा फंडा निष्फळ

मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांना मुलाखतीशिवाय पदभरती हा एकच पर्याय निवडणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील खासगी अनुदानित बिगरअल्पसंख्याक संस्थांच्या पवित्र पोर्टलवर नोंदणीचे काम सुरू झालेले आहे.

त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील संस्थांनी तत्काळ मागासवर्ग कक्ष यांचे कडून २०२२-२३ च्या संच मान्यतेच्या आधारे अद्ययावत तपासलेले बिंदू नामावली अपलोड करण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.

"ज्या संस्थांनी अद्याप या कार्यालयाकडून बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी केलेली नाही, त्यांनी तत्काळ २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार मंजूर पदांची बिंदू नामावली तयार करून मागासवर्ग कक्ष नाशिककडून अंतिम तपासणी करून पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी. रोस्टरची पवित्र पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर मग विषयनिहाय जागा नोंदवाव्या लागतात. त्या वेळी जिल्ह्यात त्या विषयाचे उपलब्ध असलेले अतिरिक्त शिक्षक यांचा विचार करून विषयनिहाय रिक्त जागा अप्रूव्ह करण्यात येतील." - प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद

Teacher Recruitment
Mid Day Meal Plan: माध्यान्ह भोजन योजना अखेर बंद; मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने योजना गुंडाळली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.