Nashik News : विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्णांसाठी बी.एस्सी. नर्सिंग या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. (Registration opportunities for BSc Nursing CET till 26 may nashik news)
सीईटी सेलकडून या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया बुधवार (ता.१७) पासून सुरू केली जात असून, पात्र विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
यंदा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता बी.एस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी राज्यस्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते आहे. एकीकडे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पार पडत असताना मंगळवारी सीईटी सेलतर्फे एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी परीक्षेसाठी सूचनापत्रक प्रसिद्ध केलेले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी २६ मेपर्यंत तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी २७ मेपर्यंत मुदत दिली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शंभर गुणांसाठी परीक्षा
या सीईटी परीक्षेत प्रत्येकी एक गुणासाठी शंभर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयांच्या प्रत्येकी वीस प्रश्नांचा समावेश असेल.
इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार असून, त्यासाठी दीड तासांची वेळ असणार आहे. परीक्षेची दिनांक यथावकाश जारी केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.